⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | रायसोनी महाविद्यालयात ‘फॅब्रिकेशन क्लब’चे उद्घाटन

रायसोनी महाविद्यालयात ‘फॅब्रिकेशन क्लब’चे उद्घाटन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ फेब्रुवारी २०२२ । कच‍ऱ्याचे वाढते प्रमाण, त्यामुळे निर्माण होणा‍‍ऱ्या समस्या रोखण्यासाठी आपले घर, परिसर, महाविद्यालय तसेच विविध भागातूनही हातभार लावू शकतो. घरात निर्माण होणा‍‍ऱ्या कच‍ऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘टाकाऊतून टिकाऊ’चा पर्याय अधिक कल्पकपणे अवलंबून आपणही कचरामुक्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकू शकतो. त्यामुळे कच‍ऱ्यात जाणा‍ऱ्या अनेक वस्तूंचा पुनर्वापर होऊ शकेल व कचरा व्यवस्थापनाला प्रोत्साहन असा उद्देश समोर ठेवत रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयातील मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागातर्फे फॅब्रिकेशन क्लबचे उद्घाटन करण्यात आले आहे.

रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाने नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा अवलंब करताना महाविद्यालयात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीने, दर्जेदार शिक्षण कसे देता येईल व त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याचा प्रामुख्याने विचार करत रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयामध्ये फॅब्रिकेशन क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या क्लबच्या उद्घाटन कार्यक्रमाला रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, प्रा. सौरभ गुप्ता, मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. दिपेनकुमार रजक, प्रा. वसिम पटेल, प्रा. अविनाश पांचाल, प्रा. अमोल जोशी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले.

योग्य रस्ता दाखविणाऱ्या घुबडाची निर्मिती

फॅब्रिकेशन क्लबच्या उद्घाटन कार्यक्रमात विध्यार्थ्यानी टाकाऊ वस्तू गोळा करत एका आर्टीफिशीअल घुबडाची निर्मिती केली आहे. बहुतेकदा रस्त्याने प्रवास करताना नागरिकांना आपण जात असलेल्या ठिकाणाचा योग्य मार्ग माहित नसतो त्यामुळे बऱ्याचदा अशा नागरिकाचे हाल होतात व त्यांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागते त्यामुळे भविष्यात या नागरिकांसाठी फॅब्रिकेशन क्लबच्या विध्यार्थ्यानी निर्माण केलेली आर्टीफिशीअल घुबड उपयुक्त ठरणार आहे. सर्व बाजूनी चाचणी केल्यानंतर हि घुबड नागरिकांना कन्फ्युज करण्याऱ्या चौकात स्थापन करण्यात येईल व त्यानंतर रस्ता विसरलेल्या नागरिकाला अचूक रस्ता दाखविण्याचे काम हि घुबड करणार आहे. भविष्यात विध्यार्थ्याच्या या प्रकल्पामुळे मोठ्याप्रमाणात नागरिकांना फायदा होणार असून सध्या या प्रकल्पावर विध्यार्थ्यांचे अजून काम सुरु आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह