⁠ 
रविवार, मे 19, 2024

आनंदाची बातमी ! सोने – चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, काय आहे आजचे दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२२। जळगाव सुवर्णनगरीत गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात तेजी दिसून आली. दरम्यान आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घट झाली आहे. आज जळगाव सराफ बाजारात सोने ५५० रुपयाची घट झाली आहे. तर चांदीच्या १२७० रुपयाने स्वस्त झाली आहे. त्यापूर्वी काल सोन्याच्या भावात ८२० रुपयाची तर चांदीच्या भावात १२८० रुपयाची वाढ झाली होती.

आज बुधवारी जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ५०,५४० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा ६४,४७० रुपये प्रति किलो इतका आहे.दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते. दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ दिसून येते.

रशिया-युक्रेन या देशादरम्यानच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याच्या दराने पुन्हा उसळी घेतली आहे. जळगाव सुवर्णनगरीत गेल्या आठवड्याच्या पहिल्याच दिवसापासून सोने चांदीच्या भावात तेजी दिसून आली. गेल्या आठवड्याच्या सोन्याच्या भावात तब्बल १०६० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदी तब्बल २५९० रुपयांनी महागली आहे.

दरम्यान, सोने आणि चांदी मधील दरवाढ ही आंतरराष्ट्रीय जगतातील घडामोडीवर झाली असून ती तात्पुरती असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला. आगामी सहा-आठ दिवसांत वाढलेले दर पुन्हा खाली येतील, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
गेल्या आठवड्यातील दर
सोने दर :
७ फेब्रुवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०५० रुपये प्रति तोळा
८ फेब्रुवारी (मंगळवार) ४९,३६० रुपये प्रति तोळा
९ फेब्रुवारी (बुधवारी) ४९,५६० रुपये प्रति तोळा
१० फेब्रुवारी (गुरुवार) ४९,८०० रुपये प्रति तोळा
११ फेब्रुवारी (शुक्रवा) ५०,१०० रुपये प्रति तोळा

चांदी दर:
७ फेब्रुवारी (सोमवार) चांदीचा दर ६२,२८० प्रति किलो
८ फेब्रुवारी (मंगळवार) चांदीचा दर ६३,४९० प्रति किलो
९ फेब्रुवारी (बुधवारी) चांदीचा दर ६३,८३० प्रति किलो
१० फेब्रुवारी (गुरुवार) चांदीचा दर ६४,१६० प्रति किलो
११ फेब्रुवारी (शुक्रवार) चांदीचा दर ६४,७५० प्रति किलो

सूचना : सदर सोने आणि चांदीने दर हे ऑनलाईन आहे. तरी अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा

हे देखील वाचा: