भुसावळ

गुरुवारी होणार नगरसेवक अपात्रता प्रकरणाची सुनावणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२ । ९ नगरसेवकांनी पक्ष सदस्यता, नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचा राजीनामा न देताच पक्षांतर केल्याने त्यांना महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ च्या कलम ३ -अ नुसार अपात्र करावे, अशी याचिका भाजपच्या नगरसेविका पुष्पाबाई रमेशलाल बतरा यांनी केली आहे.

पालिकेच्या २०१६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्षांसह ९ नगरसेवकांनी १७ डिसेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांना अपात्र करावे, अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल आहे.

या प्रकरणी सोमवारी ऑनलाइन सुनावणी झाली. त्यात तक्रारदार पक्षाने खुलासा सादर केला. पुढील सुनावणी गुरुवारी (दि.१७) होईल. या प्रकरणी संबंधित ९ नगरसेवकांनी ज्यावेळी याचिका दाखल झाली, त्या दिवशी आम्ही नगरसेवक नव्हतो. कार्यकाळ पूर्ण झाल्यावर याचिका दाखल केल्याने ती रद्द करावी, असा प्राथमिक खुलासा यापूर्वीच्या सुनावणीत दिला होता. यावर सोमवारी झालेल्या सुनावणीत, तक्रारदार पक्षाने संबंधितांनी पालिकेचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच पक्षांतर केल्याने त्यांना सहा वर्षांसाठी अपात्र करावे, असे म्हणणे सादर केले. तक्रारदारीतर्फे ॲड. राजेश राय, तर नगरसेवकांतर्फे ॲड.महेश भोकरीकर, ॲड. हरिष पाटील, ॲड. सचिन कुलकर्णी यांनी काम पाहिले.

हे देखील वाचा:

Related Articles

Back to top button