⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये समन्वय असणे गरजेचे : प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये समन्वय असणे गरजेचे : प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२ । शिक्षण प्रक्रियेत प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. प्राध्यापक-पालक सहविचार सभेचे आयोजन करीत असताना विद्यार्थी हित आणि महाविद्यालयाची वाटचाल याचा विचार करण्याची संधी मिळते असे प्रतिपादन रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयात शिक्षक पालक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर ऍकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा व अभियांत्रिकी प्रथमवर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वढदकर यांची उपस्थिती होती.

डॉ. प्रिती अग्रवाल पुढे म्हणाले कि, कोरोनाच्या संकटामुळे शिक्षण क्षेत्रात असंख्य अडचणी निर्माण झाल्या विद्यार्थी महाविद्यालयापासून आणि शिक्षणापासून दुरावत चालला असताना महाविद्यालयाने विविध शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली स्थानिक प्रशासन आणि पालकांनी सक्रिय सहभाग घेऊन शाळेच्या गुणवत्तेची दखल घेतली. तसेच यावेळी ऍकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा म्हणाले कि, पालकांची उल्लेखनीय उपस्तीथी समाधानकारक आहे. रायसोनी महाविद्यालयात शिक्षणा बरोबरच अनेक शैक्षणिक उपक्रम राबवून विध्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाची सर्वांगीण जडणघडण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभियांत्रिकी प्रथमवर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वढदकर यांनी महाविद्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेऊन पालकांच्या सूचनांचे स्वागत केले. तसेच या प्रसंगी काही उपस्थित पालकांनी आपले मनोगत व्यक्त करत रायसोनी महाविध्यालयाच्या शैक्षणिक कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मयुरी गचके यांनी केले तर आभार प्रा. रफिक शेख याने मांडले. सभेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्युटचे संचालक प्रितम रायसोनी यांनी कौतुक केले.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह