जळगाव लाईव्ह न्यूज । १४ फेब्रुवारी २०२२ । आजाराला कंटाळून ४४ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना यावल तालुक्यातील भालोद येथे उघडकीस आली. ललित जनार्दन परतणे (वय-४५) असे मयताचे नाव असून याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत असे की, ललित परतणे हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना दुर्धर आजार जडला होता. या आजारामुळे त्यांना शारीरिक त्रास होत होता. त्यामुळे रविवार १३ फेब्रुवारी रोजी ललित परतने यांनी राहत्या घरात असलेल्या पहिल्या मजल्यावर दोरीने छताच्या हुकाला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सकाळी उघडकीला आले.
नातेवाईकांनी त्यांना खाली उतरून यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस नाईक किरण चाटे करीत आहेत.
हे देखील वाचा :
- अखेर महायुतीतील हायव्होल्टेज ड्रामा संपला! देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
- जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ट्रॅकचा थरार
- अखेर भाजपच्या गटनेत्याची निवड; देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
- ‘खाकी’चा उरला नाही धाक! जळगावात बंद घर फोडून सोने-चांदीच्या दागिन्यांसह टीव्ही लांबविला
- भुसावळहुन धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल करण्याची मागणी