⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | जळगाव जिल्हा | आरटीई प्रवेशप्रक्रिया : जिल्ह्यात ९२ शाळांमध्ये १०७६ जागांची नोंदणी, ‘या’ तारखेपासून सुरु होणार अर्जप्रक्रिया

आरटीई प्रवेशप्रक्रिया : जिल्ह्यात ९२ शाळांमध्ये १०७६ जागांची नोंदणी, ‘या’ तारखेपासून सुरु होणार अर्जप्रक्रिया

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२२ । आरटीई प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू होऊन अनेक दिवस उलटूनही शाळांनी नोंदणी केलेली नाही. आतापर्यंत मागील वर्षीच्या आकडेवारीनुसार २९६ पैकी केवळ ९६ शाळा व १०७६ पटसंख्येची नोंदणी झाली आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) शाळांमध्ये आर्थिक व दुर्बल घटकांतील मुलांसाठी २५ टक्के जागा राखीव असतात. या जागांवर विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो.

शालेय शिक्षण विभागातर्फे २०२२- २३ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेशप्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले होते; मात्र शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण न झाल्याने सुधारित वेळापत्रक आले आहे. त्यानुसार पालकांना आता १६ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज भरता येतील. आतापर्यंत जिल्ह्यातील ९२ शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, १०७६ जागा उपलब्ध झाल्या आहेत. ही प्रक्रिया १५ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून, १६ फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल.

संभाव्य वेळापत्रकानुसार अर्ज प्रक्रिया १ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू होणार होती. तर ८ व ९ मार्च २०२२ ला सोडतही करण्याचे जाहीर केले हाेते. त्यानंतर मार्च, एप्रिल व मे महिन्यांत चार टप्प्यात ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, शाळांची नोंदणी पूर्ण न झाल्याने १६पासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल.

हे देखील वाचा:

author avatar
टीम जळगाव लाईव्ह