जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२२ । प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मिळणारे आठ महिन्याचे मोफत धान्याची परस्पर काळ्याबाजारात विक्री करणे एका रेशनदुकानदाराला चांगलेच भोवले आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली येथील आजाबराव सिताराम पाटील या रेशनदुकानदारावर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, तालुक्यातील चिखली येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक (22) चे परवानाधारक आजाबराव सिताराम पाटील रा. चिखली ता. मुक्ताईनगर यांना शासनाकडून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत एप्रिल २०२० ते नोव्हेंबर २०२० या काळात लाभार्थ्यांसाठी मोफत धान्य वाटप करण्यासाठी धान्य वितरीत करण्यात आले होते.
पुरविण्यात आलेल्या धान्यांपैकी ७० क्विंटल गहू, ३६ क्विंटन तांदूळ आणि साडे आठ क्विंटल दाळ यांची परस्पर विल्हेवाट लावून शासनाची फसवणूक केली आहे. याबाबत मुक्ताईनगर पुरवठा निरीक्षक ऋषीकेश तानाजी गावडे (वय-२७) यांच्या फिर्यादीवरून रेशनदुकानदार आजाबराव सिताराम पाटील याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहूल खताळ हे करीत आहे.
हे देखील वाचा :
- जळगाव शहरातील हॉटेलमध्येच सुरु होता कुंटणखाना; पोलिसांनी छापा टाकताच..
- समाजाशी नाळ जोडून ठेवणे आपले कर्तव्य : आमदार राजूमामा भोळे
- कधीकाळी होता 100 रुपये पगार, आता.. अयोध्या राम मंदिरातील मुख्य पुजाऱ्याला मिळतोय ‘इतका’ पगार?
- खातेवाटपनंतर मंत्री गुलाबराव पाटीलांची पहिली प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाले..
- चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक समोर; भारत-पाकिस्तान सामना ‘या’ दिवशी रंगणार?