जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२२ । चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ४ रोजी ‘फिनान्शियल लिटरसी’ या विषयावर राष्ट्रीय बेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी ऍड. संदीप सुरेश पाटील (अध्यक्ष, महात्मा गांधी शिक्षण मंडळ, चोपडा) ऑनलाईन उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी तसेच मार्गदर्शक वक्ते म्हणून प्रा.डॉ.अनिल पी.डोंगरे (संचालक, व्यवस्थापन प्रशाळा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), प्रा.डॉ.श्याम जे. साळुंखे (अ.र.भा.गरुड कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय,शेंदुर्णी) व प्रा.डॉ. रवींद्र ए. जाधव (के.जे.सोमय्या कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, कोपरगाव), महाविद्यालयाचे प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, उपप्राचार्य प्रा.डॉ.व्ही.टी.पाटील, उपप्राचार्य.एन.एस.कोल्हे, उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे आदि मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य व व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ.सी.आर.देवरे यांनी केले. या वेबिनारला देशभरातून विविध राज्यातील जवळपास ५१९ हून अधिक संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थी यांनी नोंदणी केली होती.
पहिल्या सत्रात प्रा.डॉ.अनिल पी.डोंगरे ‘Indian Financial system & its Instruments’ या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘आर्थिक साक्षरतेचे मूलभूत ज्ञान लोकांना करेल साक्षर तसेच आर्थिक साक्षरता ही काळाची गरज आहे. आर्थिक साक्षरतेचे मूलभूत ज्ञान लोकांना स्वावलंबी व स्वतंत्र बनविण्यास ठरेल पोषक असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी त्यांनी भांडवली बाजारपेठ, भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेचे घटक तसेच भारतीय बँक व्यवस्था, अर्थव्यवस्थेची सामग्री यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात प्रा.डॉ. श्याम जे. साळुंखे ‘Modern Payment system & its Awareness in india’ या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, आपण कमविलेले पैसे व त्याचे व्यवस्थापन करण्यास सक्षम करते ते ग्राहकाने ओळखले पाहिजे.आर्थिक व्यवस्थापनाची मुलभूत तत्वेजाणून घेऊन आपल्या दैनंदिन जीवनात लागू करणे ही काळाची गरज आहे.पैशांचे व्यवस्थापन करतांना जीवनावर त्याचा सकारात्मक परिणाम होईल यांची दक्षता घेतली पाहिजे.
तिसऱ्या सत्रात प्रो.डॉ. रवींद्र ए. जाधव यांनी ‘Portfolio Management’ या विषयावर बोलतांना सांगितले की, ‘आर्थिक साक्षरता व्यक्तीला तो काय खरेदी करतो? तो कार्य खर्च करतो? हे वेगळे करण्यासाठी अर्थसंकल्पीय मार्गदर्शक तयार करण्यास सक्षम करते.आर्थिक साक्षरता लोकांना स्वतंत्र आणि स्वावलंबी बनण्यास मदत करते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, आर्थिक साक्षरता ही काळाची गरज असून सर्वांनी आपल्या कमाई सोबतच त्याच्या विनियोगाची पद्धतशीर आखणी केल्यास जीवन सुखकर होईल. सर्वांनी आर्थिक बाबींचे मुलभूत ज्ञान संपादन करणे ही काळाची गरज आहे. यावेळी त्यांनी गुंतवणूक करतांना जोखीम कशाप्रकारे कमी केली जाईल. त्यासंदर्भात काय करावे व काय करून नये याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार.ए.एच.साळुंखे यांनी मानले. या वेबिनारप्रसंगी बहुसंख्य प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक,उद्योजक तसेच महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी ऑनलाईन उपस्थित होते.
हे देखील वाचा :
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- सरकारी नोकर भरतीतील शिंदे-फडणवीस सरकारच्या गेमचेंजर पॉलिसीमुळे पात्र युवकांना संधी
- 10वी आणि 12वी परीक्षेच्या फीमध्ये वाढ; आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार?
- लाल किल्ल्यावरून मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा
- विनापरीक्षा नोकरीची मोठी संधी ; 3256 जागांवर निघाली भरती, पगारही भरघोष मिळेल..