जळगाव लाईव्ह न्यूज । फेब्रुवारी २०२२ । दारूची बाटली न दिल्यामुळे एकाने बार मालकाला शिवीगाळ, मारहाण करून त्याच्या खिशातून एक हजार रुपये बळजबरीने लुटल्याची घटना १ रोजी रात्री १० वाजता घडली. या प्रकरणी एका विरोधात जबरी लुटीचा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

महेंद्र पमनदास ललवाणी (रा.जुना सरकारी दवाखाना) हे १ रोजी रात्री १० वाजता धुळे रोडवरील त्यांच्या योगेश बारच्या बाहेर उभे होते. त्यावेळी आर.के.नगर मधील बबलू महाराज याने त्यांच्याकडे दारूची बाटली मागितली. बार मालकाने नकार देताच बबलू महाराज याने शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. तसेच दमदाटी करून त्यांच्या शर्टाच्या वरच्या खिशातील एक हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. महेंद्र ललवाणी यांच्या फिर्यादीवरून बबलू महाराज यांच्या विरुद्ध अमळनेर पोलिसांत जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर करत आहेत.

हे देखील वाचा :
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- जळगावात जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणारा जेरबंद
- Jamner : टायर फुटला अन् पोषण आहाराचा टेम्पो पलटी; दोन हमालांचा जागीच मृत्यू
- मेहुणबारे पोलिसांकडून गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त






