जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२२ । पाचोरा तालुक्यातील विष्णूनगर (गाळण) येथील २४ वर्षीय मनीषा राठोड या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान विवाहितेच्या गळ्यावर दोरीचे व्रण असल्याने, तिचा गळा आवळून खून झाल्याचा आरोप विवाहितेच्या भावाने केला. तसेच मृत महिलेच्या पतीचे अन्य महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचाही आरोप केला आहे. याबाबत पाचोरा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
धुळे तालुक्यातील मुंडाणे तांडा येथील मनीषाचा विवाह विष्णूनगर येथील चेतन दलेरसिंग राठोड याच्याशी दोन वर्षांपूर्वी झाला होता. विवाह झाल्यावर दोन महिन्यांनंतर सासरच्या मंडळींकडून मनिषाला हुंडा व संसारोपयोगी वस्तू न दिल्याने टोचून बोलत होते. मनीषा माहेरी गेल्यानंतर तिने भाऊ ज्ञानेश्वर जगन्नाथ राठोड याला पतीच्या अनैतिक संबंधांची माहिती सांगितली होती. भावाने समजूत काढून तिला नांदायला पाठवले होते.
मृत महिलेच्या पतीचे अन्य महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचाही आरोप केला आहे. याबाबत विवाहितेने दीड वर्षांपूर्वी तिच्या वहिनीला ही घटना सांगितली होती. मात्र, पती सुधारेल अशी समजूत काढून भावाने तिला सासरी पाठवले होते. मात्र, सासरी विवाहितेचा छळ केला जात होता. विवाहितेच्या गळ्यावर दोरीचे व्रण असल्याने, शवविच्छेदन इनकॅमेरा व्हावे अशी मागणी विवाहितेच्या भावाने केली. पाचोरा पोलिसा स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शुक्रवारी सकाळी सहा वाजता विवाहितेचा भाऊ ज्ञानेश्वर याला विवाहितेचा जेठ जयसिंग राठोड याने फोन केला. तुझ्या बहिणीला झोपेतच हृदयविकाराचा झटका येऊन तिचा मृत्यू झाला आहे, असे सांगून त्याने फोन कट केला. ज्ञानेश्वरने गावातील एक-दोन जणांना घटनेविषयी माहिती फोनद्वारे विचारली. मात्र, प्रत्येकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे नातेवाईकांसह विष्णुनगर गाठले. दरम्यान विवाहितेच्या गळ्यावर दोरीचे व्रण असल्याने, तिचा गळा आवळून खून झाल्याचा आरोप विवाहितेच्या भावाने केला. याप्रकरणी पोलिसांनी संशयती पती चेतन राठोड याला ताब्यात घेतले आहे.पोलिस उपअधीक्षक भारत काकडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, उपनिरीक्षक गणेश चौबे हे पुढील तपास करत आहेत.
नऊ महिन्यांच्या बाळाचे मातृछत्र हरपले
मृत विवाहितेला ९ महिन्यांचा यश नावाचा मुलगा आहे. पोलिसांनी पती चेतन राठोड याला ताब्यात घेतले आहे.
हे देखील वाचा :
- जळगाव शहरातील हॉटेलमध्येच सुरु होता कुंटणखाना; पोलिसांनी छापा टाकताच..
- समाजाशी नाळ जोडून ठेवणे आपले कर्तव्य : आमदार राजूमामा भोळे
- कधीकाळी होता 100 रुपये पगार, आता.. अयोध्या राम मंदिरातील मुख्य पुजाऱ्याला मिळतोय ‘इतका’ पगार?
- खातेवाटपनंतर मंत्री गुलाबराव पाटीलांची पहिली प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाले..
- चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक समोर; भारत-पाकिस्तान सामना ‘या’ दिवशी रंगणार?