जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२२ । जळगाव ते शिरसोली दरम्यान अप रेल्वे लाईनवर धानोरा शिवारात बुधवारी सकाळी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. उप स्टेशन प्रबंधक एस.बी. सनस यांनी दिलेल्या खबरीनुसार जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. दरम्यान, तरुणाचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत आढळून आल्याने त्याचा अपघात झाला की घातपात हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
धानोरा शिवारात रेल्वे लाईनवर आढळून आलेल्या तरुणाचे वय अंदाजे 30 ते 35 आहे. दि.2 रोजी सकाळी 10.15 वाजेच्या सुमारास मृतदेह आढळून आला आहे. तालुका पोलिसात दाखल करण्यात आलेल्या अकस्मात मृत्यू प्रकरणातील मयत अनोळखी तरुणाची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
रंगाने सावळा, अंगाने मध्यम असलेल्या या तरुणाची दाढी बारीक वाढलेली असून तो निर्वस्त्र स्वरुपात आढळून आला आहे. हा घातपात आहे की अपघात याबद्दल चर्चा सुरु आहे. धावत्या ट्रेनच्या धक्क्याने तो मयत झाला आहे की त्याला कुणी मयत व निर्वस्त्र अवस्थेत रेल्वे लाईनवर आणून टाकले याबाबत चर्चा सुरु आहे.
हे देखील वाचा :
- गोदावरी अभियांत्रिकीत स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन उत्साहात
- जळगावात आणखी एक अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
- जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले
- Jalgaon : दुचाकी लांबविणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
- रेल्वेत 10वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 4000 पेक्षा जास्त जागांसाठी भरती, इतका पगार मिळेल?