जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२२ । जिल्ह्यात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घेतला आहे. शहरासह ग्रामीण भागात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशात धार येथून दुचाकी चोरून बेटावद (ता.शिंदखेडा) येथे किराणा दुकानात चोरी करणारे, संशयित अमळनेर पोलिसांच्या हातून निसटले. परंतु चोरीची दुचाकी आणि मुद्देमाल पकडण्यात पोलिसांना यश आले. सर्व मुद्देमाल नरडाणा पोलिसांच्या ताब्यात दिला.
बेटावद येथे तीन संशयितांनी चोरी केली. त्यानंतर तिघे एकाच दुचाकीवर पळून जात होते. नरडाणा पोलिसांनी संशयितांचा पाठलाग सुरू केला. मात्र चोरटे वेगाने अमळनेरकडे पसार झाले. नरडाणा पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक शशिकांत कोळी यांनी, अमळनेर पोलिसांना संदेश पाठवला. त्यावेळी रात्रीच्या गस्तीवर पोलिस उपनिरीक्षक गंभीर शिंदे यांनी गलवाडे रस्त्यावर नाकाबंदी केली.
काही वेळानंतर एक दुचाकी वेगाने आली. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तिघे सुसाट निघाले. पोलिसांनी पूर्वतयारी म्हणून दुचाकी सुरू ठेवल्या होत्या. लागलीच त्यांचा पाठलाग सुरू केला. चोरट्यांची कोंडी झाल्याने त्यांनी दुचाकी (क्र.एम.एच.१९-डी.टी.४७२२) आणि चोरलेले ४५०० रुपये ठेवलेली पिशवी सोडून संशयित अंधारात पसार झाले.
हे देखील वाचा :
- महिन्याला 1000 ते 5000 रुपयांच्या SIP मुळे तुम्ही कोट्यधीस कधी व्हाल? जाणून घ्या हे गणित..
- शेअर्समध्ये गुंतवणूक करायची नाहीय? मग FD मध्ये गुंतवणूक करा; SBI, HDFCसह ‘या’ बँका देताय ‘इतके’ व्याज?
- मामाकडे राहणाऱ्या तरुणाने उचललं धक्कादायक पाऊल ; जळगावातील घटना
- पंजाब नॅशनल बँकेत 12 वी पास उमेदवारांसाठी संधी; किती पगार मिळेल?
- -30अंशातही प्रवास सुरळीत होईल; जम्मू-श्रीनगर ‘वंदे भारत’चा पहिला लूक समोर..