जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२१ । कोरोना महामारीमुळे नागरिक सर्वत्र त्रस्त आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा देखील जाणवत आहे. अशावेळी रुग्णांना काहीसा दिलासा देण्यासाठी म्हणून रोटरी क्लब जळगाव इस्टने 3 ऑक्सिजन काँसंट्रेटर मशीन शनिवार ३ मार्च पासून तत्काळ उपलब्ध करून दिले आहे.
जागतिक आरोग्य दिन ७ एप्रिल रोजी आहे. त्या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टने कोरोना आजाराचा वाढता व्याप पाहता तत्काळ 3 ऑक्सिजन काँसंट्रेटर खरेदी करून जनसेवेत उपलब्ध केले आहे. जळगाव शहरातील रुग्णांसाठी अल्पदरात भाडे घेऊन हे सामान्य नागरिकांना घरी मिळू शकणार आहे. जे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या मार्गावर आहेत, मात्र त्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार काही काळ ऑक्सिजन लागण्याची शक्यता असते अशा रुग्णांना हे काँसंट्रेटर मिळू शकणार आहे. यावेळी जळगाव जनता सहकारी बँकेचे उपाध्यक्ष डॉ. प्रताप जाधव, रोटरी उपप्रान्तपाल अपर्णा मकासरे, डॉ जगमोहन छाबडा यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी अध्यक्ष भावेश शाह, सचिव हितेश मोतिरमानी, मेडिकल प्रमुख डॉ. राहुल भन्साली, संजय गांधी, संजय शाह, संजय भंडारी, विजय लाठी, गोविंद वर्मा, सचिन खडके, शरद जोशी आदी उपस्थित होते.
यासाठी रोटरी क्लबने ४ सम्पर्क मोबाईल क्रमांक जारी केले आहे. यात अध्यक्ष भावेश शाह (९४२१९७४६६१), डॉ. जगमोहन छाबडा (९८९००३४९००), डॉ. राहुल भन्साली (९४२२२७८१५७), सचिन खडके (९९२२२४३५९८, ०२५७- २२२०४६८) यांच्याशी गरजू रुग्णांनी संपर्क साधावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टतर्फे करण्यात आले आहे.