जळगाव लाईव्ह न्यूज । १ फेब्रुवारी २०२२ । आज नव्या महिन्याच्या सुरुवातीलाच आणि अर्थसंकल्पापूर्वी सोन्याच्या (Gold Rate) भावात किंचित वाढ झालेली दिसून आली. तर दुसरीकडे मात्र चांदीच्या (Silver Rate) भावात घसरण झाली आहे. आज मंगळवारी जळगाव सुवर्ण नगरीत सोन्याच्या भावात ७० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदीच्या भावात ५० रुपयाची घसरण झाली आहे. त्यापूर्वी काल आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने ३०० रुपयाने स्वस्त झाले होते तर चांदी ९४० रुपयांनी स्वस्त झाली होती.

आजच्या दरवाढीने जळगाव सराफ बाजारात सोने ४८,८०० रुपये प्रति तोळा इतका आहे. चांदीचा भाव ६२,४१० रुपये प्रति किलो इतका झाला आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते. दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात 4 ते 5 हजारांची वाढ दिसून येते.

जळगाव सराफ बाजारात गेल्या महिन्यात सोन्या-चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ उतार होत असल्याचे पहायला मिळाले. गेल्या महिन्याच्या १ जानेवारीला सोने ४९,०१० प्रति तोळा इतका होता. तर चांदी ६३,६२० रुपये प्रति किलो इतका होता. काल महिन्याच्या अखेरीस सोने ४८,७३० रुपये प्रति तोळ्यावर आला होता. तर चांदी ६२,४६० रुपये किलोवर आले होते.
तर गेल्या आठवड्याचा विचार केल्यास सोन्याच्या दरात किंचित ३०० रुपयापर्यंची घसरण दिसून आली. तर चांदीच्या दरात जवळपास ३ हजार रुपयाची घसरण दिसून आली. दरम्यान, लग्नसराईचा हंगाम असल्याने काही प्रमाणात सोन्याची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने भावात देखील तेजी दिसून येत आहे.
सोने दर :
२४ जानेवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,३८० रुपये प्रति तोळा
२५ जानेवारी (मंगळवार) ४९,७०० रुपये प्रति तोळा
२६ जानेवारी (बुधवारी) ४९,७०० रुपये प्रति तोळा
२७ जानेवारी (गुरुवारी) ५०,००० रुपये प्रति तोळा
२८ जानेवारी (शुक्रवार) ४९,०३० रुपये प्रति तोळा
चांदी दर:
२४ जानेवारी (सोमवार) चांदीचा दर ६६,३३० प्रति किलो
२५ जानेवारी (मंगळवार) चांदीचा दर ६५,४६० प्रति किलो
२६ जानेवारी (बुधवारी) चांदीचा दर ६६,३३० प्रति किलो
२७ जानेवारी (गुरुवारी) चांदीचा दर ६५,५७० प्रति किलो
२८ जानेवारी (शुक्रवार) चांदीचा दर ६३,४०० प्रति किलो
सोन्याची शुद्धता कशी तपासायची
24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिले आहे.
22 कॅरेटच्या दागिन्यांवर 916 लिहिले आहे.
21 कॅरेट सोन्याच्या ओळखीवर 875 लिहिले जाईल.
18 कॅरेटच्या दागिन्यांवर 750 लिहिले आहे.
14 कॅरेटच्या दागिन्यांवर 585 लिहिले आहे.
सूचना : सदर सोने आणि चांदीने दर हे ऑनलाईन आहे. तरी अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.
हे देखील वाचा :
- सोने-चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक! जळगावात चांदी तब्बल ५ हजारांनी स्वस्त, सोनेही घसरले
- सणासुदीपूर्वीच सोने-चांदीने फोडला ग्राहकांना घाम; जळगावमध्ये सलग 9 व्या दिवशी मोठी वाढ, पहा ताजे दर?
- सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा भडका; जळगावात दोन दिवसांत तब्बल ‘इतक्या’ हजारांची वाढ?
- ग्राहकांना झटका! चांदी १० हजारांची तर सोन्यात ३ हजारांहून अधिकची उसळी, आता नवीन दर काय?
- ग्राहकांना दिलासा! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा भाव घसरला; जाणून घ्या नवीन दर?











