जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जानेवारी २०२२ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात महिला आणि मुलींवर होणारे अत्याचार काही थांबताना दिसत नाहीये. अशातच अमळनेर तालुक्यातून जिल्हयाला हादरवणारी घटना समोर आलीय. मुकबधीर असल्याचा फायदा घेत दोन जणांनी एका १६ वर्षीय मुलीवर गेल्या सात महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करून गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेतला असून इतर फरार झाला आहे. अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमकी घटना?
अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणारी मुकबधिर १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. अल्पवयीन मुलगी ही मुकबधिर असल्याचा गैरफायदा घेत गावातील दिपक नाना भिल आणि लखन उर्फ अंकुश बुध भिल यांच्यासह इतर काही मुलांनी तिला गेल्या सात महिन्यांपासून शेतात घेवून जावून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली. हा प्रकार अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांना समजल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी पीडीत मुलीच्या वडीलांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून रितसर तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रविवारी ३० जानेवारी रोजी रात्री अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी दिपक नाना भिल आणि लखन उर्फ अंकुश बुध भिल यांच्यासह इतर गल्लीतील मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ करीत आहे. यातील संशयित आरोपी लखन उर्फ अंकुश बुध भिल याला अटक केली आहे.
हे देखील वाचा :
- महिन्याला 1000 ते 5000 रुपयांच्या SIP मुळे तुम्ही कोट्यधीस कधी व्हाल? जाणून घ्या हे गणित..
- शेअर्समध्ये गुंतवणूक करायची नाहीय? मग FD मध्ये गुंतवणूक करा; SBI, HDFCसह ‘या’ बँका देताय ‘इतके’ व्याज?
- मामाकडे राहणाऱ्या तरुणाने उचललं धक्कादायक पाऊल ; जळगावातील घटना
- पंजाब नॅशनल बँकेत 12 वी पास उमेदवारांसाठी संधी; किती पगार मिळेल?
- -30अंशातही प्रवास सुरळीत होईल; जम्मू-श्रीनगर ‘वंदे भारत’चा पहिला लूक समोर..