⁠ 
रविवार, जानेवारी 12, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | पती, मुलगा गमावलेल्या महिलेला सोशल मिडियातून २ लाखांची मदत

पती, मुलगा गमावलेल्या महिलेला सोशल मिडियातून २ लाखांची मदत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२२ । पतीच्या मृत्यूनंतर कमावता मुलगाही अपघातात गेल्याने दुःखाचे डोंगर कोसळलेल्या पातोंडा येथील माऊलीच्या मदतीसाठी सोशल मीडिया धावून आला. या माध्यमातून जमा झालेली दोन लाख एक हजाराची रक्कम या परिवाराकडे सुपूर्द करण्यात आली.

पातोंडा येथील गौरव पवार याचे मागील महिन्यात अज्ञात वाहनांच्या धडकेने अमळनेर चोपडा रोडवर निधन झाले. त्याच्या वडिलांचे ही त्याच्या लहानपणीच निधन झाले. कमावता मुलगा गेल्याने त्याच्या परिवारावर मोलमजुरी ची वेळ आली होती. याच गोष्टीचा विचार करत प्रशांत भदाणे यांनी व्हाटसऍपच्या माध्यमातून एक गौरव पवार मित्र परिवार हा ग्रुप तयार करून जिल्हाभरातील सर्व कृषी कंपनी प्रतिनिधी, कृषी केन्द्र धारकांना या ग्रुपच्या व्हाट्सएपच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले.

अमळनेर, धरणगाव, पारोळा सीड्स असोसिएशन आणि अमळनेर पारोळा, धरणगाव, चोपडा, जळगांव, पाचोरा कंपनी प्रतिनिधी यांनी पुढाकार घेतला आणि रु.२,०१,००० (दोन लाख एक हजार रुपये) एवढी रक्कम जमा झाली. ही रक्कम २६ जानेवारी रोजी दुपारी गौरव पवार यांच्या पातोंडा येथे गावी जाऊन त्याच्या परिवारातील सदस्य त्याची आई कविता पवार, भाऊ मयूर आजोबा रमेश पवार, रविंद्र पवार, स्वप्नील पवार यांना रकमेचा धनादेश सुपुर्द करण्यात आला.

यावेळी अमळनेर येथील प्रशांत भदाणे, पांडुरंग कोळी, राहुल धनगर पंकज पाटील, गणेश मराठे, प्रमोद पाटील आनंद सोनवणे, गणेश कंवर. समाधान पाटील, लक्ष्मण पाटील, दिलीप पाटील, अनिल पाटील, राकेश पाटील, चोपडा येथील महेंद्र बाविस्कर, भूषण निकम, जळगांवचे सुनील मुळे, अमोल विचुरकर, धरणगावचे गोविंदा पाटील, अमोल पाटील, पाचोरा येथील हेमंत राठोड तसेच अमळनेर सीइस पेस्टी असोसिएशनचे योगेश पवार, किरण पाटील, दीपक पाटील, मगन पाटील, सचिन पाटील महेंद्र पाटील, बाळासाहेब पवार, संदीप पाटील आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह