⁠ 
रविवार, जानेवारी 12, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | बहादपूर, शिरसोदे व महाळपुरच्या पाणीपुरवठा योजनेस मान्यता

बहादपूर, शिरसोदे व महाळपुरच्या पाणीपुरवठा योजनेस मान्यता

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२२ । अमळनेर विधानसभा मतदारसंघात असलेल्या पारोळा तालुक्यातील बहादपूर, शिरसोदे व महाळपुर या तीन गावांना प्रचंड पाणीटंचाई असल्यामुळे नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी 2014 पासून ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू असताना आमदार अनिल पाटील यांच्या अथक प्रयत्नाने व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या आशीर्वादाने या तीन गावांच्या पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळाली असल्याने तिन्ही गावात आनंदोत्सव साजरा होत आहे.

तामसवाडी धरणावरून सुमारे 13 ते 14 किमी पाईपलाईन टाकून ही योजना निर्माण होणार असून यासाठी 1168.30 लक्षच्या अंदाज पत्रकास जलजीवन मिशन अंतर्गत मान्यता देण्यात आली आहे. तीन गावांच्या दृष्टिकोनातून हे अतिशय मोठे काम आमदारांनी मार्गी लावल्याने बहादरपूर, शिरसोदे आणि महाळपुर या गावातील ग्रामस्थ कमालीचे सुखावले आहेत. सदर पाणी पुरवठा योजनेसाठी २७ रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत या योजनेस मंजुरी देण्यात आली. या बैठकीला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार अनिल पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत पाटील, शिरसोदे सरपंच रमेश सैंदाणे महाळपुर, सरपंच सुधाकर पाटील, शिरसोदे ग्रामपंचायत उपसरपंच ए. आर. पाटील, शालिग्राम बडगुजर, राकेश गुरव महाळपुर, माजी उपसरपंच प्रभाकर पाटील व गुलाब पाटील आदी उपस्थित होते. या मंजुरीचे पत्रक तिन्ही गावांच्या लोकप्रतिनिधींच्या हाती सुपूर्द करण्यात आले.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह