जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२२ । राज्यासह जिल्ह्यात रक्तपेढ्यांना रक्तपिशव्याचा तुटवडा भासत आहे. काेराेनाच्या दाेन वर्षांच्या काळातही भासली नव्हती अशी चणचण जानेवारी महिन्यातच भासत आहे. रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी आगामी रक्तदान शिबिरांवर भिस्त आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाचा औचित साधत सामाजिक संस्थांनी रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या २ वर्षात काेराेनाच्या लाटेंमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यात आराेग्य शस्त्रक्रियांसाठी तसेच थॅलेसेमिया रुग्णासाठी नियमित लागणारे रुक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे शहरातील तीनही समाजिक रक्तपेढ्यांना दरराेज समस्यांना सामाेरे जावे लागत आहे. गेल्या दाेन लाटेत नव्हे तर प्रथमच यंदा जानेवारी महिन्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्याचे जळगाव शहरातील रक्तपेढ्यांच्या व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.
उन्ह्याळ्यात भासताे तुटवडा
उन्हाळ्यातील एप्रिल, मे, जून, जुलै या चार महिन्यात रक्ताची चणचण भासते. या काळात काॅलेजस बंद असतात. त्यासाेबत लग्नसराई व सणवारामुळे प्रतिसाद कमी असताे. मात्र, यंदा प्रथमच जानेवारी महिन्यातच रक्ताचा तुटवडा भासत आहे.
शिबिर राबवण्याची गरज
प्रजासत्ताक दिवनाचे औचित साधत सामाजिक संस्थांसह शासकीय कार्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयाेजन केल्यास माेठ्या प्रमाणावर रक्त संकलन हाेऊन रक्त टंचाईची समस्या दूर हाेण्यास मदत हाेईल असे रेडक्रासच्या जनसंपर्क अधिकारी उज्ज्वला वर्मा व गाेळवलकर रक्तपेढीचे व्यवस्थापक जितेंद्र शहा यांनी सांगितले.
महिन्याला १५० पिशव्यांची गरज
माधवराव गाेळवलकर रक्तपेढी, रेडक्राॅस ब्लड बँक व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीला महिन्याला किमान १२५ ते १५० रक्तपिशव्याची मागणी असते; परंतु सद्यस्थितीत केवळ शंभरच रक्तपिशव्या गाेळा हाेत आहेत.
हे देखील वाचा :
- दुचाकीसह दुकान फोडून मुद्देमाल लांबविणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संविधान दिनदर्शिकेचे विमोचन
- डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वर्षोल्हास २०२५ प्रर्दशन
- खुशखबर! जळगावमार्गे धावणार पहिली वंदे भारत स्लीपर; कुठुन कुठपर्यंत धावणार अन् कोणत्या स्थानकांवर थांबणार?
- जळगावचा सराईत गुन्हेगार नागपूर कारागृहात स्थानबद्ध