जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२२ । भांडवली बाजारातील अनिश्चितता आणि महागाई वाढ यामुळे सोन्यामध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. गेल्या काही दिवसात सोने चांदीचे दर महागले आहे. जळगाव सराफ बाजारात काल सोन्याच्या दरात ३२० रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे एका तोळ्याचा भाव ४९ हजारांवर गेला आहे. तर चांदी देखील महागली आहे. चांदीचा एका किलोचा दर ६५ हजारांवर गेला आहे. मागील महिनाभरातील उच्चांकी दर आहे.
आजचा सोने आणि चांदीचा भाव :
सध्या जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ४९,७०० इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६५,४६० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.
दरम्यान, चालू आठवड्याच्या पहिल्या दिवशी, भारतीय भांडवल बाजारात उदासिनतेमुळे घसरण पहायला मिळाली. बाजारपेठांमध्ये नकारात्मक वातावरण निर्माण झाले असून गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे सोन्यातील तेजी दिवसागणिक वाढत आहे. जळगाव बाजारात गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात ४१८० रुपयांनी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे सोने देखील महागले आहे. गेल्या आठवड्यात सोने चार वेळा महागले आहे. त्यात ६१० रुपयाने सोने महागले आहे. तर गेल्या १५ दिवसांमध्ये सोने १००० हजार रुपयापर्यंत महागले तर चांदी तब्बल ५७०० रुपयांनी महागली आहे.
गेल्या आठवड्यातील दर?
१७ जानेवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,९०० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,०५० रुपये असा होता. १८ जानेवारी (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०४० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,३५० रुपये इतका नोंदविला गेला. १९ जानेवारी (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६४,५०० रुपये इतका नोंदविला गेला. २० जानेवारी (गुरुवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,५१० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६५,९१० रुपये इतका नोंदविला गेला
सोन्याची शुद्धता कशी तपासायची
24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिले आहे.
22 कॅरेटच्या दागिन्यांवर 916 लिहिले आहे.
21 कॅरेट सोन्याच्या ओळखीवर 875 लिहिले जाईल.
18 कॅरेटच्या दागिन्यांवर 750 लिहिले आहे.
14 कॅरेटच्या दागिन्यांवर 585 लिहिले आहे.
हे देखील वाचा :
- गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस संपन्न
- डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगींग प्रतिबंध विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
- अक्षरयात्री साहित्य संमेलनातून जागतिक मैत्रीचा संदेश सर्वदूर जाईल – इरोशनी गलहेना
- लसूण पोहोचला ५०० रुपये किलोवर; गृहिणींचे किचन बजेट कोलमडले
- आरआरबी परीक्षार्थीसाठी भुसावळ, जळगावमार्गे १० रेल्वे गाड्या धावणार