जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२१ । कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिलासह दोन जणांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. ही घटना जळगावमधील अजिंठा चौकातील ट्रान्सपोर्ट नगरजवळ महामार्गावर घडली असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, सोमवारी २४ जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास जात असतांना अजिंठा चौफुलीच्या पुढे असलेल्या ट्रान्सपोर्ट नगरजवळील महामार्गावर भुसावळकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कार (एमएच १५ एचक्यू ०९५७) ने दुचाकी(एमएच १९ डीजी ५४९३) ला जोरदार धडक दिली. सोनाली गणेश लोखंडे (वय ४१, रा. अशोकनगर, अयोध्यानगर जळगाव) त्यांचा मुलगा जयेश व बहिणीचा मुलगा वैभव असे तीघे (एमएच १९ डीजी ५४९३) हे जखमी झाले.
या धडकेत दुचाकीवरील तिघे रस्त्याच्या मधोमध फेकले गेले. यात जयेश आणि वैभव हे दोघांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी सोनाली लोखंडे यांनी सोमवारी २४ जानेवारी रोजी कारचालकाविरूध्द तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विजय पाटील तपास करीत आहेत.
हे देखील वाचा :
- खा.स्मिता वाघसह आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते महाराष्ट्र निर्यात संमेलनाचे उद्घाटन
- महाराष्ट्रातील प्रवास महागणार; रिक्षा, टॅक्सीसह एसटीच्या तिकीट दरात होणार वाढ
- लहानग्यांच्या कल्पनेतून साकारले वैज्ञानिक प्रदर्शन; डॉ. उल्हास पाटील इग्लीश मिडीयम स्कुलचा उपक्रम
- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील विशेष चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न
- बसच्या धडकेत सैन्य दलातील जवान गंभीर जखमी; जळगाव शहरातील घटना