जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२२ । रोटवद ते साळवादरम्यान स्कूटरला अज्ञात ट्रॅक्टरने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात जामदा ( ता. चाळीसगाव ) येथील रहिवासी तथा निवृत्त कृषी सहाय्यक मानसिंग देवसिंग पाटील (वय ६०) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २४ रोजी सायंकाळी घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मानसिंग पाटील हे साेमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास दुचाकी (ॲक्टिव्हा)ने राेटवट फाट्याजवळून जात हाेते. या वेळी समोरून येणाऱ्या अज्ञात ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. एम. डी. पाटील यांचा मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. कृषी सहाय्यक म्हणून मानसिंग देवसिंग पाटील यांनी चोपडा तालुक्यातील गोरगावले, मंगरूळ, वेले, संपुले आदी गावामध्ये कृषी सहायक म्हणून सेवा बजावली आहे. जवळपास १५ वर्षे ते गोरगावले येथे वास्तव्याला होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचा ही मृत्यू झाला हाेता. त्यांनी चोपडा येथील शहर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत होमगार्ड म्हणून उत्तम काम केले आहे. त्यांच्या पश्चात १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे. मुलगा मुंबई येथे पोलिस दलात आहे, असे एम. डी. पाटील यांच्या मित्रांनी सांगितले. दरम्यान, अपघाताचे वृत्त कळताच चाेपडा व जामदा येथील नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली हाेती.
चाेपड्यात नेहमीच सुरु असायची ये-जा
एम. डी. पाटील हे सध्या चाळीसगाव येथे वास्तव्याला असले तरी त्यांचे चोपड्यात कायम ये-जा सुरु असायची. साेमवारी दुपारी साडेतीन वाजता ते मित्रांना भेटून त्यांनी एका ओळखीच्या टेलरकडे कपडे शिवायला टाकले. त्यानंतर ते चोपड्यातून धरणगाव येथे आपल्या साडूकडे थांबणार होते. दरम्यान, मार्गातच त्यांचा सायंकाळी अपघातात मृत्यू झाला. त्यांचा अपघाताचे वृत्त कळतात त्यांच्या नातलगांसह चोपड्यातील मित्र परिवाराकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे देखील वाचा :