⁠ 
रविवार, जानेवारी 12, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | वादळी वाऱ्याने शेतकरी संकटात, रब्बी पिके भुईसपाट

वादळी वाऱ्याने शेतकरी संकटात, रब्बी पिके भुईसपाट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२२ । अमळनेर तालुक्याला शनिवारी रात्री तसेच पहाटेपासून अचानक वादळी वाऱ्याने झोडपून काढले. पहाटे रब्बीच्या पिकांवर संकट कोसळल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. वाऱ्याचा वेग जोरदार असल्याने काही भागात फुलोऱ्यावर आलेल्या रब्बी मका, ज्वारी, ऊस, दादरचे मोठे नुकसान झाले. तसेच रब्बी दादर ज्वारीसह मका, गहू ही पिके जमीनदोस्त झाली आहेत.

तालुक्यातील काही भागात सध्या रब्बी ज्वारी फुलोऱ्यावर आली आहे. तर अचानक आलेल्या वादळाने बहरलेल्या ज्वारी व मक्याला जमीनदोस्त केले. तालुक्यात खरीप हंगामात-ही अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान केले होते. खरिपात पिकांचे उत्पन्न हातात न आल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी केली हाेती. परंतु, अचानक आलेल्या वादळाने रब्बी पिके जमिनदोस्त झाल्याने दोन्ही हंगामात उत्पन्न न आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या वादळाने मका, गहू आणि फळ बागांचे मोठे नुकसान झाले.

तीन मंडळात धुमाकूळ

शहरासह तालुक्यात मांडळ, मारवड, कळमसरे महसुली मंडळात शनिवारी रात्री अचानक वादळी वाऱ्याचा वेग वाढला हाेता. यामुळे तीन मंडळातील गहू, मका, रब्बी ज्वारी, दादर यांना वादळाचा फटका बसला आहे. दरम्यान, दिवसभरात तालुका कृषी विभागाचा एकाही अधिकारी शेतीच्या बांधापर्यंत पाेहाेचला नव्हता.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह