जळगाव शहर

जळगावात एकाच ठिकाणी दोन एसटी बसेसवर दगडफेक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२१ । विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी गेल्या अडीच महिन्यापासून संपावर असून यात काही कामावर परतलेल्या मोजक्या कामगारांच्या बळावर सेवा सुरू करण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नात अडथळे आणले जात आहेत. जळगावात एकाच ठिकाणी आज दोन एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. दुपारी पावणे एकच्या सुमारास हा प्रकार घडला असून यात गाड्याचे नुकसान झाले असून एक चालक जखमी झाला आहे.

जळगाव-धुळे या मार्गावर विचखेडा या गावाजवळून एसटी बस (क्रमांक एम एच २० बी.एल. ४०९७) जात असताना मोटरसायकल क्रमांक ०७८५ वरील दोन व्यक्तींपैकी मागे बसलेल्या व्यक्तीने सदर बसवर दगड फेकून मारला. या दगडफेकीत बसची समोरील काच फुटून चालक संजय गोविंद रंधे (चालक क्रमांक २८८०) यांना दुखापत झाली आहे.

या घटनेनंतर काही वेळातच याच ठिकाणी धुळ्याहून जळगावला निघालेल्या दुसऱ्या बसवर (क्रमांक एम एच २० ३३८१) याच लोकांनी दगडफेक केली. या दगडफेकीत बसची काच फुटली. बस चालक सोपान सपकाळे (क्रमांक १३५८) यांनी प्रसंगावधान राखून बसवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अपघात टळला.

या संदर्भात पारोळा पोलीस ठाण्यामध्ये संशयित दुचाकीस्वारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूराव पाटील करीत आहेत.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button