⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

सोनटेक शिवारात बिबट्या सक्रिय, निलगाईचा फडशा; शेतकऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । पाचोरा तालुक्यातील कुरंगी हद्दीतील सोनटेक शिवारात बिबट्याने नीलगायीला ठार केल्याची घटना २१ रोजी दुपारी शेतकरी श्याम बाजीराव पाटील यांच्या मक्याच्या शेतात उघडकीस आली.

याबाबत शेतकरी श्याम पाटील यांना बिबट्याच्या हल्ल्याचा आवाज आल्याने ते आवाजाच्या दिशेने गेले. त्यावेळी बिबट्याने त्यांच्यावरही हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीस श्याम पाटील यांनी आरडाओरड करत घटनास्थळावरून पळ काढल्याने बिबट्या तेथून पसार झाला. याबाबत ग्रामस्थांनी तात्काळ वनविभागाला घटनेची माहिती दिली. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्याच्या पायांचे ठसे घेतले. परिसरातील शेतकऱ्यांनी रात्री एकटे शेतात जाणे टाळावे. रात्री अंधारात जाताना घोळक्याने जावे, हातात टॉर्च आणि मजबुत काठी घ्यावी, मोबाईलवर मोठ्याने गाणी वाजवावी, गुरांच्या गोठ्यातही रात्री दिवे सुरु ठेवावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे. शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी.

हे देखील वाचा :