जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२१ । रस्त्याने पायी चालणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील ४० हजार रूपये किंमतीची मंगलपोत तोडून अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना जळगाव शहरात घडलीय. निशा सुरेंद्र काबरा (वय-४९) असे पोत चोरून नेलेल्या महिलेचे नाव असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे कि, शहरातील रिंगरोड परिसरातील हरेश्वर नगरात निशा सुरेंद्र काबरा (वय-४९) ह्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांचे पती सुरेंद्र गणपत काबरा हे जिल्हा न्यायालयात सरकारी वकील म्हणून नोकरीला आहेत. गुरूवारी २० जानेवारी रोजी सायंकाळी निशा काबरा ह्या पती अँड. सुरेंद्र काबरा यांच्यासोबत आकाशवाणी चौकातील श्री दत्त मंदिरात दर्शनासाठी गेले होते.
रात्री आठ वाजेच्या सुमारास दर्शन घेऊन पायी घराकडे परतत असताना त्यांच्या मागून आलेल्या एकाने निशा काबरा यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किंमतीची १५ ग्रँम मंगळसूत्र लांबविले. त्यानंतर संबंधित व्यक्ती आकाशवाणी चौक परिसरातील अग्रवाल हॉस्पिटलच्या मागे पळून गेला. याप्रकरणी निशा काबरा यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चांदेकर हे करीत आहेत.
हे देखील वाचा :
- भारतीय सिनेमांना जगभरात उत्तम प्रतिसाद ; केंद्रीय सचिव संजय जाजू
- जळगाव महावितरणमध्ये 140 जागांसाठी भरती
- Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जानेवारीचा हप्ता ‘या’ तारखेपर्यंत जमा होणार
- Yawal: मीटरमध्ये छेडछाड, यावलमधील ‘या’ गावातील महावितरणने ५० मीटर घेतले ताब्यात..
- Gold Rate : जळगावच्या सुवर्णपेठेत एकाच दिवसात सोने-चांदी दरात मोठी वाढ, भाव वाचून फुटेल घाम