जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२२ । शहरातील इक़रा शिक्षण संस्था संचलित एच.जे. थीम महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी करियर कट्टा सुरू करण्यात आला असून त्याचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ.अब्दुल करीम सालार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. इकबाल शाह, उपाध्यक्ष, इकरा शिक्षण संस्था जळगाव उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्रांतर्गत करियर कट्टा सुरु करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना करिअरच्या वाटा बाबत माहिती मिळावी, उद्योजक होणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्योगाबाबतचे मार्गदर्शन मिळावे, शासनाच्या विविध योजना व परीक्षण बाबत माहिती मिळावी व विद्यार्थी अपडेट व्हावेत, या हेतूने इकरा महाविद्यालयात करियर कट्टा सुरु करण्यात आला आहे.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. इब्राहिम पिंजारी, उपप्राचार्य डॉ. युसुफ पटेल उपस्थित होते. करियर कट्टा अंतर्गत उपक्रमांमध्ये युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. त्यात आय. ए. एस. आपल्या भेटीला, उद्योजक आपल्या भेटीला, भारतीय संविधानाचे पारायण, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी वृत्तवेध फाउंडेशन कोर्स, वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ई-फायलिंग कोर्स आणि टेक्निकल विद्यार्थ्यांसाठी सायबर सिक्युरिटी कोर्स यांचा समावेश आहे. या उपक्रमाशी संबंधित महाविद्यालयातील मोहम्मद कैफ शेख शकील आणि फाएजा इरम फातेमा शाकीर अली या दोन विद्यार्थ्यांची ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली.
करियर कट्टा समन्वयक म्हणून डॉ. शेख इरफान बशीर यांची नियुक्ती करण्यात आली असून या उपक्रमात डॉ. राजेश भामरे, डॉ. फिर्दोसी, डॉ. चांद खान, डॉ. हाफीज शेख, डॉ. वकार शेख, डॉ. राजू गवरे, डॉ. सदाशिव डापके, डॉ. तनवीर खान, डॉ. अमीन काजी, प्रा. उमर पठाण उपस्थित होते.
हे देखील वाचा :
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- सरकारी नोकर भरतीतील शिंदे-फडणवीस सरकारच्या गेमचेंजर पॉलिसीमुळे पात्र युवकांना संधी
- 10वी आणि 12वी परीक्षेच्या फीमध्ये वाढ; आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार?
- लाल किल्ल्यावरून मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा
- विनापरीक्षा नोकरीची मोठी संधी ; 3256 जागांवर निघाली भरती, पगारही भरघोष मिळेल..