⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | एरंडोल | एरंडोलात महिला मंडळांनी केला रणरागिणींचा सन्मान

एरंडोलात महिला मंडळांनी केला रणरागिणींचा सन्मान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२२ । पती निधनानंतर खचून न जाता हिंमतीने कुटूंब सांभाळणे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊंचा आदर्श नेहमी डोळ्यासमोर ठेवूनच जीवन जगावे असे आवाहन एरंडोल येथील साई-गजानन महाराज मंदिरात आयोजित मेळाव्यात महिलांना मान्यवर महिलांनी केले. यावेळी अलका पाटील, निर्मला पाटील, अर्चना पाटील, शैला पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कोरोना काळात महिलांनी देखील आपली आणि कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.

राजमाता जिजाऊ महिला मंंडळ, जिजाऊ ब्रिगेडतर्फे आयोजित महिला मेळाव्यातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेविका इंदिरा पाटील तर प्रमुख अतिथी जिजाऊ ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्षा धुळे येथील डॉ. सुलभाताई कुवर, सिंगल वूमन फाऊंडेशन जळगांवच्या अध्यक्षा मिनाक्षीताई चव्हाण, धुळे जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा नुतन पाटील, धुळे ग्रामीण अध्यक्षा आशा पाटील उपस्थित होत्या. व्यासपीठावर बचपन स्कूलच्या प्राचार्या डॉ. सुरेखा पाटील, सम्यक स्कूल प्राचार्या नीता पाटील यांचेसह शशिकला जगताप, रंजना पाटील, वंदना पाटील होत्या.

कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन, प्रतिमापुजन आणि जिजाऊ वंदनाने करण्यात आली. यावेळी विधवा महिलेने कोरोनामुळे पती गमावलेल्या दोन मुलांच्या विधवा तरूणीसोबत आपल्या मुलाचे लग्न लावण्याचा शिवधर्म पध्दतीने सोहळा पार पडला. यावेळी मात्र उपस्थित सर्वच महिलांनी कौतूक करून उत्कृष्ट संवाद, उत्तम सादरीकरणाची वाहवा केली. वधू-वरांना शुभेच्छा देवून सादरकर्ते लेखन करणार्‍या जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा मनिषा पाटीलचे अभिनंदन केले.
महिलांना संक्रांतीचे वाण, तीळगुळ वाटप करून उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ काढून बक्षिसे वाटप करण्यात आली. शेवटी स्नेह भोजनानंतर कोरोना नियमांचे पालन करून कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंदना पाटील यांनी, सूत्रसंचलन मनिषा पाटील यांनी तर आभार प्रदर्शन शकुंतला अहिरराव यांनी केले.

यावेळी शोभा साळी, क्षमा साळी, आरती ठाकूर, नगरसेविका वर्षा शिंदे, शालिनी कोठावदे, सपना शर्मा, शशिकला मानुधने, रश्मी दंडवते, हिराबाई पाटील, सुरेखा पाटील, अनिता चव्हाण, शोभा पाटील, शकुंतला पाटील, रजनी काळे, लता पाटील, संध्या महाजन, रत्ना देवरे, दर्शना तिवारी आदींची उपस्थित लाभली. यशस्वीतेसाठी स्वाती पाटील, मधुरा पाटील, छाया पाटील यांचेसह राजमाता जिजाऊ महिला मंडळ सदस्यांनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह