जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२२ । कोरोना पार्श्वभूमीवर अनेक निवडणूक पुढे ढकलण्यात आले आहे. त्यात कोरोनाच्या तिसर्या लाटेमुळे जळगाव जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक जाण्याची शक्यता असल्याने महिनाभरापासून निवडणुकीच्या राजकीय हालचाली मंदावल्या होत्या. मात्र, आता आयोगाकडून निवडणूक वेळेतच होण्याचे संकेत मिळाले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी तयारीला पुन्हा गती दिली आहे.

संभाव्य गट-गणात पक्षांची सदस्य नोंदणी, भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडून गटांच्या प्रारूप रचनेची प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होवू शकते. राजकीय पक्षांनी संभाव्य उमेदवारांची चाचपणी, त्यांच्याकडून गट-गणात केलेल्या कामांची माहिती जमवण्याचे काम सुरू केले आहे. पक्षाच्या निरीक्षकांकडून कोरोनाच्या लाटेचा अंदाज घेवून बैठका, भेटी आणि दौर्याचे नियोजन केले जात आहे.
जिल्हा परिषदेत आचारसंहितेचे सावट या पंधरवाड्यात जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात असून आचारसंहितेच्या शक्यतेने विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांची कामे मार्गी लावण्यासाठी धावपळ सुरू आहे. जिल्हा परिषदेत असमान निधी वाटपाच्या तक्रारीमुळे कामांना स्थगिती मिळाली आहे. ही स्थगिती लवकर उठून कामांचे तांत्रीक सोपस्कर आचारसंहितेपुर्वी पुर्ण व्हावेत यासाठी जिल्हा परिषद सदस्य दिवसभर जिल्हा परिषदेत तळ ठोकून आहेत.
हे देखील वाचा :
- आनंदाची बातमी! जळगावमार्गे धावणार उधना-गया विशेष ट्रेन
- बस स्थानकात पर्स लांबवणाऱ्या ६ महिला जेरबंद
- महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस झोडपणार; 25 जिल्ह्यांना अलर्ट
- Gold Rate : आठवडाभरात सोने तीन हजारांनी घसरले, जळगाव सुवर्णनगरीतील आजचे नवीन दर तपासून
- जिल्हा वार्षिक पतयोजना 2025-26 चे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न