⁠ 
बुधवार, नोव्हेंबर 27, 2024
Home | वाणिज्य | महागड्या गॅस सिलिंडरचा त्रास संपणार! जाणून घ्या कधी मिळेल अनुदान?

महागड्या गॅस सिलिंडरचा त्रास संपणार! जाणून घ्या कधी मिळेल अनुदान?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२२ । कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे. गॅस सिलिंडरपासून ते डाळी, तेल, भाजीपाल्यापर्यंतचे भाव गगनाला भिडले आहेत. एलपीजी सिलिंडरच्या सततच्या वाढत्या किमतीमुळे जनता हैराण झाली आहे. सध्या वेगवेगळ्या शहरांमध्ये १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत ९०० ते ९५० रुपये आहे.

माफक सबसिडीसह महागाईपासून दिलासा नाही
यापूर्वी केंद्र सरकारकडून एलपीजी सिलिंडर खरेदीवर ग्राहकांना सबसिडी दिली जात होती, त्यामुळे सिलिंडरची किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये ठेवली जात होती. मात्र कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर सरकारने हे अनुदान बंद केले. नंतर सरकारने माफक सबसिडी सुरू केली असली तरी महागाईपासून दिलासा देण्यासाठी ती अपुरी होती.

एलपीजी सबसिडी पुन्हा बहाल केली जाऊ शकते
आता पुन्हा एलपीजी सिलिंडरवर पूर्वीप्रमाणेच सबसिडी मिळणे अपेक्षित आहे. असे झाल्यास त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल आणि सिलिंडरची किंमत कमी होईल. सरकार एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी बहाल करण्याचा विचार करत आहे. नुकताच या संदर्भातील प्रस्तावही अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे.

…तर सिलिंडर 587 रुपयांना मिळेल
वित्त मंत्रालयाला पाठवलेल्या प्रस्तावात झारखंड, मध्य प्रदेश आणि ईशान्य राज्यांमध्ये एलपीजीवर सबसिडी दिली जात असल्याचे म्हटले आहे. देशातील इतर राज्यांतही ते सुरू होण्याची गरज आहे. अर्थ मंत्रालयाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास सरकार पेट्रोलियम कंपन्यांच्या डीलर्सना 303 रुपये सबसिडी देईल. ग्राहकांना या सवलतीचा लाभ थेट सिलिंडरच्या किमतीत मिळणार आहे. म्हणजेच ज्या सिलिंडरसाठी तुम्ही ९०० रुपये देत आहात, त्यासाठी तुम्हाला फक्त ५८७ रुपये मोजावे लागतील.

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.