शासकीय कार्यालयात प्रवेशासाठी घ्यावी लागेल विभागप्रमुखांची परवानगी
जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२२ । शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रविवारी सायंकाळी आदेश काढले.असून, शासकीय कार्यालयात विभागप्रमुखांच्या परवानगीशिवाय बाहेरील व्यक्तीस परवानगी नाकारण्यात आली आहे.
महाविद्यालये आधीच बंद झाले असून, सोमवारपासून सर्व माध्यमाच्या शाळाही बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कोरोनोचा संसर्ग वाढत असल्याने रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. सकाळी ५ ते रात्री ११ या वेळेत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एका ठिकाणी येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मास्क सॅनिटायझरचा वापर बंधनकारक आहे. शासकीय कार्यालयातील बैठका ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांना वर्क फ्राॅम होमचे आदेश दिले असून, दक्षता घेण्याचेही सूचित करण्यात आले आहे.
जिल्ह्यात कडक निर्बंध लागू : शाळा, महाविद्यालये बंद, बाेर्डाचे उपक्रम सुरू राहणार
खासगी कार्यालयांना कामगारांसाठी शिफ्टनुसार ५० टक्के उपस्थितीत नियाेजन करावे लागणार आहे. सर्व माध्यमांच्या शाळा बंद ठेवण्यात येणार असून, दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून निश्चित करण्यात आलेले उपक्रम सुरू राहतील असेही आदेशात म्हटले आहे.
हे देखील वाचा :