जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । अवकाळी पावसाने खरिपात शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. आता पुन्हा गेल्या चार दिवसांपासून अवकाळी सुरु असल्याने याचा फटका रब्बी हंगामातही चांगलाच बसत असल्याचे चित्र चोपडा तालुक्यातील पारगाव येथे ७ रोजी रात्री आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात उभे असलेला मका, दादर व अन्य पिकांचे माेठे नुकसान झाले. गेल्या चार वर्षात अवकाळी पावसाने परिसरातील शेतकऱ्यांना हैरान करुन सोडले आहे.

यात पारगाव, मितावली, धानोरा, कमळगाव, पुनगाव आदी शिवारात माेठ्या प्रमाणात नुकसात होत असते. दरम्यान, ७ रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे पारगाव शिवारातील उभा असलेला मका, दादर ही पिके आडवी झाली अाहे. यामुळे सुरेश किसन पाटील, भीमराव नामदेव पाटील, सुभाष रामदास पाटील, अशोक महारू पाटील, अरुण सुकलाल पाटील, उत्तम दशरथ पाटील, विजय रामराव पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. दरम्यान, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करुन भरपाई मिळावी, अशी अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

हे देखील वाचा :
- जळगावात पावसाला ब्रेक! सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा, तापमानाचा पारा वाढणार?
- संशोधन गुणवत्तेसोबत व्यावसायिक मूल्यांवर भर; गोदावरी आयएमआरमध्ये मार्गदर्शन सत्र
- दुष्काळासाठी उपसमिती स्थापन ! मंत्री गुलाबराव पाटलांवरही महत्त्वाची जबाबदारी
- गणेश विसर्जन मिरवणुकीत जळगाव पोलिसांचा ‘हायटेक’ बंदोबस्त; ड्रोन, दामिनी अन् सोशल मीडिया सेल सज्ज
- पोलीस दलाच्या दिमतीला १२ नव्या ‘बोलेरो निओ’; पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते लोकार्पण






