⁠ 
शनिवार, सप्टेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | एरंडोल | आ.चिमणराव पाटलांमुळे एरंडोल, पारोळा तालुक्यातील‎ रस्त्यांसाठी २३ कोटी रुपये मंजूर‎

आ.चिमणराव पाटलांमुळे एरंडोल, पारोळा तालुक्यातील‎ रस्त्यांसाठी २३ कोटी रुपये मंजूर‎

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२२ । एरंडाेल व‎ पाराेळा तालुक्यातील १० प्रमुख‎ रस्त्यांच्या कामासाठी एकूण २३‎ कोटी ३० लक्ष रुपयांचा निधी मंजूर‎ झाला आहे. तातडीने या कामांना‎ सुरुवात करण्याचा सूचना आ.‎चिमणराव पाटील यांनी‎ अधिकाऱ्यांना केल्या आहेत.‎

मतदार संघातील या सर्वच १०‎ रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली होती.‎ त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या‎ रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी‎ केलेली होती. याची आमदार‎ चिमणराव पाटील यांनी त्वरीत‎ दखल घेत शासनाकडे या संदर्भात‎ पाठपुरावा करून या रस्त्यांना मंजुरी‎ ‎ मिळवली आहे. दरम्यान, या‎ कामात एरंडोल तालुक्यातील उत्राण‎ ते भातखंडेकडे जाणारा रस्त्यासाठी ‎एक कोटी, एरंडोल, गालापुर, ताडे, ‎हनुमंतखेडे गावापर्यंतच्या‎ रस्त्यासाठी साडेचार कोटी,‎ भालगाव ते पातरखेड ते जळूपर्यंत ‎रस्त्यासाठी चार कोटी, राष्ट्रीय‎ महामार्ग क्रमांक सहापासून ते‎ कढोली गावापर्यंत रस्त्यासाठी १‎ कोटी ८० लाख, धुळपिंप्री,‎ मालखेडा ते कासोदा गावापर्यंत ‎रस्त्यासाठी तीन कोटी, खर्ची ते‎ रिंगणगाव दरम्यान पुलाचे बांधकाम‎ करण्यासाठी दीड कोटी व‎ मालखेडा ते कासोदा दरम्यान‎ पुलाचे बांधकाम करण्यासाठी दीड‎ कोटी. तसेच पारोळा तालुक्यातील‎ पारोळा शहरापासून ते शासकीय‎ ‎आयटीआय पुढे रस्त्याच्या‎ कामासाठी एक कोटी, रताळे ते‎ करमाड व शिरसमणी ते चोरवड‎ येथे रस्त्याची सुधारणा करणे व‎ शिरसमणी गावात पुलासाठी अडीच‎ कोटी व देवगाव येथे पुलासाठी‎ अडीच काेटी मंजूर झाले आहेत.‎

उर्वरित कामे पूर्ण करणार‎ एरंडोल तालुक्यासाठी १७ कोटी ३०‎ लाख व पारोळा तालुक्यासाठी ६‎ कोटी असे एकूण २३ कोटी ३० लाख‎ रस्ते व पुलांच्या बांधकामासाठी‎ मंजुर झाले आहेत. लवकरच या‎ कामांना सुरुवात होणार आहे.‎ मतदार संघातील लवकरच उर्वरित‎ कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील,‎ अशी माहिती आमदारांनी दिली.‎

हे देखील वाचा :


author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.