जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२२ । वडगाव ( ता.चाळीसगाव ) येथील लांबे शिवारात साेमवारी सकाळी मादी बिबट्याचा कुजलेला मृतदेह विहिरीत आढळला. दोन महिन्यापूर्वी याच परिसरात उसाच्या शेतात मादी बिबट्या आणि दोन बछडे आढळून आले हाेते. त्याच शिवारात मृत बिबट्या आढळून आला आहे. विहीरीजवळ दुर्गंधी आल्यानंतर शेतकऱ्यांनी विहीरीत डोकावून पाहिले असता ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून जागेवरच शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.
वडगाव लांबे येथे भिकन दगा पाटील यांच्या शेतात ही घटना उघड झाली. वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांना माहिती कळवल्यानंतर त्यांनी वनविभागाला माहिती दिली. उपवनसंरक्षक विवेक होशिंग, सहाय्यक वनसंरक्षक सुदर्शन शिसव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे, जी. एस. पिंजारी, एस. बी. चव्हाण, आर. आर. पाटील, एस. एच. जाधव, वाय. के. देशमुख, श्रीराम राजपूत यांच्यासह वनमजुरांनी मृत बिबट्याला जेसीबीद्वारे विहिरीतून बाहेर काढले. घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मीरा रावणकर यांनी शवविच्छेदन केले.
हे देखील वाचा :