⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | बारी पंच मंडळाच्या अध्यक्षपदी अरुण बारी तर सचिवपदी हर्षल बारी

बारी पंच मंडळाच्या अध्यक्षपदी अरुण बारी तर सचिवपदी हर्षल बारी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२२ । समस्त बारी पंच मंडळ जळगाव यांची बारी समाज हितवर्धिनी हॉलमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतनी कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी विजय बारी तर उपाध्यक्षपदी अरुण बारी यांची निवळ करण्यात आली.

यावेळी सभेची सुरुवात समाजाचे आद्य संत रुपलाल महाराज यांचे प्रतिमा पूजनाने झाली. तसेच गत वर्षात समाजातील ज्ञात-अज्ञात दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रस्तावना मंडळाचे सहसचिव मयुर बारी यांनी मांडली. तर सभेचे मागील वर्षाचे अहवाल वाचन मंडळाचे खजिनदार बालमुकुंद बारी यांनी केले. सभेत मागील आर्थिक वर्षातील कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला तसेच पुढील वर्षात आगामी कार्यक्रमाची रूपरेषा सर्वानुमते ठरविण्यात आली. तसेच राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली. सभेत सन २०२२-२३ साठी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात विजय बारी अध्यक्ष, अरुण बारी उपाध्यक्ष, हर्षल बारी सचिव, महेंद्र बारी उपसचिव, बालमुकुंद बारी खजिनदार, लतीश बारी सहखजिनदार, नितीन बारी प्रसिद्धीप्रमुख, मयूर बारी सहप्रसिद्धीप्रमुख, सुनील बारी सदस्य, विजय बारी सदस्य, राहुल बारी सदस्य, राजेंद्र बारी सदस्य अशी कार्यकारणी जाहीर करण्यात आली. दरम्यान, विस्तार कामी समाज बांधवांना सदस्य नोंदणीचे आवाहन समस्त बारी पंच मंडळ जळगाव यांनी केले आहे. तरी इच्छुक समाजबांधवांनी मंडळाशी संपर्क साधावा सभेचे आभार प्रदर्शन मंडळाचे नवनिर्वाचित सहसचिव महेंद्र बारी यांनी केले.तर

कार्यक्रमासाठी समस्त बारी पंच कार्यकारीणी यांनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह