⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | वरणगावच्या लोकेश पाटीलची लोकसेवा आयोग परीक्षेत बाजी

वरणगावच्या लोकेश पाटीलची लोकसेवा आयोग परीक्षेत बाजी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२२ । वरणगाव येथील शिक्षक मनोहर पाटील यांचा मुलगा लोकेश मनोहर पाटील याने दुसऱ्याच प्रयत्नात लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. या यशासाठी त्याने कुठेही क्लास न लावता घरीच नियमित बारा तास अभ्यास केला. सोशल मीडियापासून दूर राहत विविध पुस्तके, वृत्तपत्रांचे वाचन करून ज्ञानसंग्रह वाढवला. लोकेशला ९४३ गुण मिळाले होते. शुक्रवारी सायंकाळी जाहीर झालेल्या यादीत त्याचा समावेश आहे.

येथील लोकेश पाटील याचे पहिली ते दहावीचे शिक्षण शहरातील गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक विद्यालयात झाले. अकरावी व बारावी भुसावळातील के नारखेडे विद्यालयातून पूर्ण करून त्याने पुण्यातील सीओईपी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअर ही पदवी संपादन केली. यावेळी त्याने सिनियर मुलांच्या मार्गदर्शनाखाली लोकसेवा आयोग परीक्षेचा अभ्यास सुरू केला. कॉलेजमध्ये असताना पहिला प्रयत्न केला. पण, यश मिळाले नाही. २०१९ मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने सुमारे आठ महिने ज्ञान प्रबोधिनीमध्ये अभ्यास केला. प्रामुख्याने कोरोना काळात यूपीएससी परीक्षेवर लक्ष केंद्रित केले. यानंतर २०२० मध्ये प्रीमियम व मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाला. नंतर २०२१ मध्ये मुलाखत झाली. ८३६ जागांसाठी ही परीक्षा झाली होती. मुलाखतीनंतर ७६१ जागांची यादी जाहीर झाली. त्यात ९४४ पर्यंत गुण असलेल्या विद्यार्थ्यांची निवड झाली. मात्र, लोकेशला ९४३ गुण होते. एका गुण कमी असल्याने त्याचे नाव प्रतीक्षा यादीत आले. दरम्यान, ३१ डिसेंबरला राखीव ठेवलेल्या ७५ जागांची यादी लोकसेवा आयोगाने जाहीर केली. त्यात लोकेश पाटील याचे नाव आहे. दोन महिन्यानंतर कोणत्या पोस्टसाठी सिलेक्शन होईल, याबाबत माहिती मिळेल.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह