जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२२ । एका २० वर्षीय उच्च शिक्षीत तरूणीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना यावल तालुक्यातील दहीगाव येथे घडलीय. सुजाता संतोष पाटील (वय २०) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. दरम्यान,याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत असे की, दहिगाव येथील यावल रस्त्यावर असलेल्या सुरेश आबा नगरमधील सुजाता पाटील हीने आज रविवारी सकाळी ७ वाजेपुर्वी आपल्या राहत्या घरात विषारीद्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याबाबत मयत तरूणीचे काका काशीनाथ एकनाथ पाटील (वय-४८) यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावल च्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी डॉ. बी बी बारेला यांनी मयताचे शवविच्छेदन केले. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.
हे देखील वाचा :
- जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ट्रॅकचा थरार
- ‘खाकी’चा उरला नाही धाक! जळगावात बंद घर फोडून सोने-चांदीच्या दागिन्यांसह टीव्ही लांबविला
- महापालिका पाईप चोरी प्रकरणी सुनील महाजन यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- Amalner : घरफोड्या करून पैसे जमविले, कार खरेदी करण्यासाठी गेला अन् तिथेच अडकला
- पारोळ्यात दोन कार समोरासमोर धडकल्या; भीषण अपघातात पती-पत्नी जागीच ठार