रद्द झालेल्या ‘या’ १८ रेल्वे गाड्या पूर्ववत
जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२२ । दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागात चौथ्या लाइनच्या कनेक्टिव्हिटीचे काम सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने २३ डिसेंबरपासून ब्लाॅक घेतला हाेता. याचा थेट परिणाम प्रवासी रेल्वे गाड्यांवर हाेऊन भुसावळ विभागातून बिलासपूर विभागात जाणाऱ्या १८ गाड्या रद्द झाल्या हाेत्या. मात्र, एक जानेवारीपासून या गाड्या पुन्हा पूर्ववत सुरू झाल्या आहेत.
या ब्लॉकमुळे भुसावळ विभागातून जाणाऱ्या तब्बल १८ गाड्या रद्द केल्याने प्रवासाचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. या सर्व गाड्या १ जानेवारीपासून पूर्ववत झाल्या अाहे. गाडी क्रमांक १२८७० हावडा-मुंबई, १२८६९ मुंबई-हावडा, १२८१२ हटिया-एलटीटी, एलटीटी एक्स्प्रेस, २२८६६ पुरी-एलटीटी, एलटीटी-पुरी, १२८८० भुवनेश्वर-एलटीटी, एलटीटी-भुवनेश्वर, २२५१२ कामाख्य-एलटीटी, एलटीटी-कामाख्य, १२८१० हावडा- मुंबई, मुंबई-हावडा एक्स्प्रेस, १२१५१ एलटीटी-शालीमार, शालीमार-एलटीटी, १२९४९ पोरबंदर ते संत्रागाची, संत्रागाची ते पोरबंदर, २२८९४ हावडा-साईनगर शिर्डी आणि साईनगर शिर्डी ते हावडा एक्स्प्रेस या गाड्या शनिवारपासून पूर्ववत सुरू झाल्या.
हे देखील वाचा :
- Jalgaon : कुत्र्याच्या कारणावरून दगड, दांडक्याने मारहाण; तिघे जखमी
- जळगावात महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शस्त्र प्रदर्शन
- Jalgaon : जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे त्रुटीपुर्ततेसाठी विशेष मोहिमेचे आयोजन
- वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर जळगावात पोलीस दलातर्फे हेल्मेट जनजागृती रॅली
- डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात २६ व्या राज्य संयुक्त परिषदेचा शुभारंभ