⁠ 
मंगळवार, मे 21, 2024

‘त्या’ बेपत्ता विवाहितेचा जंगलात आढळला मृतदेह ; दोन संशयित ताब्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । रावेर तालुक्यातील मोरगाव येथील व विटवे येथील माहेर असलेली विवाहिता ज्योती विलास लहासे (वय ३४) हे मौजे खामखेडा येथे नातेवाईकांकडे लग्नसमारंभ निमित्त गेले असता दि २८ रोजी दुपारी बेपत्ता झाले होते. याबाबत मुक्ताईनगर पोलिसात खामखेडा येथील कैलास राजाराम तायडे यांनी मिसींग नोंदवली होती. यासंदर्भात पोलीसांकरवी तपास सुरू होता. दरम्यान दि ३१ रोजी वडोदा वनपरिक्षेत्रातील सुकळी नियतक्षेत्रातील दुई वनहद्दीत नाल्यातील पाण्यात बुडलेल्या अवस्थेत सदर विवाहितेचा मृतदेह आढळून आला. ३१ रोजी घटना उघडकीस आली.सायंकाळी दुई येथील पोलीस पाटील गुलाब कोचुरे यांनी याबाबतची माहिती मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला कळविली .पोलीसांनी ताडीने घटनास्थळ गाठत पंचनाम्यासह इतर सोपस्कार पार पाडून मृतदेह रात्री शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला.

याबाबत पोलिस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार विवाहितेचे वडिल अरुण जगन्नाथ अढागडे रा.विटवा ता.रावेर यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला असुन पोलीसांनी संशयित आरोपी दिपक मनोरे व सुकलाल वाघ दोघे राहणार विटवा ता रावेर यांना ताब्यात घेतले असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुदाम काकडे,पो काॅ संतोष चौधरी,संदिप खंडारे करीत आहे.

विवाहितेच्या पश्चात दोन मुली व एक मुलगा असे अपत्य असुन काही वर्षांपासून विवाहिता माहेरीच वास्तवास होती.विवाहितेच्या अकाली जाण्याने लहानग्यांचे मातृछत्र हरविले आहे.यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. विवाहितेचा मृतदेह बघुन नातेवाईकांनी हंबरडा फोडला.व घातपाताचा संशय व्यक्त केला. आज दि १ रोजी शवविच्छेदन करण्यात आले असुन शवविच्छेदन अहवाल बाकी आहे.

हे देखील वाचा :