जळगाव शहर

लाचखोरांवर कारवाईत जळगाव जिल्हा विभागात दुसरा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२२ । जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्षभरात एकूण ३३ लाचखोरांवर कारवाई केली. लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईत नाशिक विभागात जळगाव दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. यंदाही लाचखोरीत पोलिस, जिल्हा परिषद व महसूल विभागातील लाचखोर अव्वल स्थानी आहेत.

१ जानेवारी ते २८ डिसेंबर या कालावधीत नाशिक एसीबीने ४० लाचखोरांवर कारवाई केली. कारवाईमध्ये सन २०२० च्या तुलनेत १५ लाचखोरांवरील कारवाईने वाढ झाली. जळगाव एसीबीने ३३ लाचखोरांवर कारवाई केली. सन २०२० च्या तुलनेत त्यामध्ये १३ने वाढ नोंदवण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातही ३३ लाचखोरांवर कारवाई झाली.

सन २०२० मध्ये झालेल्या कारवाईच्या तुलनेत त्यामध्ये केवळ एका कारवाईची भर पडली. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पोलिस विभागातील ९ लाचखोरांवर कारवाई झाली. महसूल व पोलिस विभागातील प्रत्येकी ३ लाचखोरांवर कारवाई झाली. सार्वजनिक बांधकाम, एमएसइबी,आरोग्य व उपप्रादेशिक परिवहन विभागातील प्रत्येकी २ लाचखोरांवर कारवाई झाली. उर्वरित नऊ विभागातील प्रत्येकी एका लाचखोरांवर कारवाई झाली.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button