जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२१ । जळगाव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर वडील ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी थेट शिवसेनेला व शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांना जबाबदार धरलं आहे. खडसे यांच्या या आरोपांना राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. याप्रकरणाची जोपर्यंत पोलिसांकडून चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आरोप करणे चुकीचे आहे. रोहिणी खडसेंवर झालेल्या हल्ल्याची चौकशी होऊन ‘दूध का दूध पानी का पानी’ समोर येईलच. यात जो कोणी दोषी असेल, मग तो आमच्या पक्षाचा असला तरी हयगय केली जाणार नसल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.
‘रोहिणी खडसे-खेवलकर यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्हच आहे. या हल्ल्याची आयपीएस अधिकार्याकडून नि:पक्षपातीपणे चौकशी व्हावी अशी मागणी खुद्द स्थानिक आमदारांनी केली आहे. त्यानुसार चौकशी होऊन ‘दूध का दूध पानी का पानी’ समोर येईलच. यात जो कोणी दोषी असेल, मग तो आमच्या पक्षाचा असला तरी हयगय केली जाणार नाही. मात्र पोलिसांकडून चौकशी होऊन नेमक तथ्य समोर येईपर्यंत खडसे कुटुंबीयांनी शिवसेनेला बदनाम करू नये, असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.
रोहिणी खडसे यांच्यावरील हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. हा कसला शिवसेनेचा आमदार? असंही खडसे म्हणाले होते. त्यावरही पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ‘चंद्रकांत पाटील हे कोणत्या पक्षाचे आमदार आहेत त्याचे सर्टिफिकेट एकनाथ खडसेंनी देऊ नये. तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. कोण कोणत्या पक्षात होते आणि पक्ष सोडून आता कोणत्या पक्षात आहे हे सार्या जगाला माहिती आहे. त्यामुळं कोण कोणत्या पक्षाचा हे बघण्यापेक्षा तो महाविकास आघाडीचा आमदार आहे हे महत्त्वाचं आहे. खडसे स्वत: आघाडीचे नेते आहेत. गोष्टी इतक्या पुढं जाऊ नयेत याची काळजी त्यांनी आधीपासूनच घ्यायला हवी होती. आमचेही विरोधक जळगाव जिल्ह्यात आहेत. आम्हीही एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढतो, पण इतक्या खालच्या पातळीवर कोणी जात नाही. त्यामुळं दोन्ही बाजूंकडून गोष्टी समजुतीनं घेतल्या पाहिजेत,’ असा सणसणीत टोला पाटील यांनी खडसे यांना हाणला.
हे देखील वाचा :
- उमेदवारांनो मुंबई गाठा! निकलाआधी शरद पवारांच्या महत्त्वाच्या सूचना, वाचा काय आहेत?
- चाळीसगाव मतदारसंघात कोणता आमदार निवडून येणार? पाहा exit Poll
- महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार? वाचा सट्टा बाजाराचा अंदाज?..
- जळगाव जिल्ह्यात सरासरी 65.77 टक्के मतदान
- मतदानाच्या शेवटच्या क्षणी काँग्रेसने उद्धव ठाकरेंना दिला धक्का; काय आहे बातमी वाचा..