जळगाव लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२१ । यावल येथील कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागामार्फत, २६ रोजी महाविद्यालयातील सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण २१३ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. स्पर्धेत एसवायएबीएससी वर्गाची विद्यार्थिनी प्रीती निळेने प्रथम क्रमांक मिळवला.
विद्यार्थ्यांच्या सामान्यज्ञानात भर पडावी, त्यांचा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सराव व्हावा व त्यांच्यात चौफेर वाचनाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन प्रभारी प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या प्रेरणेतून करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रिती निळे प्रथम, दिव्या निळे (एफवायबीएससी)द्वितीय व रिजवान तडवी (एफवायबीएससी) याने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच सोनल वाघ (एसवायबीकॉम) व अश्विनी गजरे (एफवायबीए) यांना उत्तेजनार्थ बक्षीस घोषित करण्यात आले. स्पर्धेचे आयोजन मराठी विभाग प्रमुख डाॅ. सुधा खराटे यांनी केले होते. उपप्राचार्य प्रा.ए. पी. पाटील, प्रा .एम. डी. खैरनार, संजय पाटील, विभागाचे सहकारी सुभाष कामडी यांनी कौतूक केले.
हे देखील वाचा :
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- सरकारी नोकर भरतीतील शिंदे-फडणवीस सरकारच्या गेमचेंजर पॉलिसीमुळे पात्र युवकांना संधी
- 10वी आणि 12वी परीक्षेच्या फीमध्ये वाढ; आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार?
- लाल किल्ल्यावरून मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा
- विनापरीक्षा नोकरीची मोठी संधी ; 3256 जागांवर निघाली भरती, पगारही भरघोष मिळेल..