जळगाव शहर

भगवंताच्या नामस्मरणात मिळते मनःशांती : हभप विशालशास्त्री गुरुबा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२१ । तारुण्यावस्थेत केलेली भक्ती वृद्धावस्थेत कामात येते, तर वृद्धावस्थेत केली भक्ती मोक्षप्राप्तीसाठी कामात येते. भगवंताच्या नामस्मरणात मनःशांती मिळते असे मार्गदर्शन भागवताचार्य हभप विशालशास्त्री गुरुबा यांनी केले.

धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील कार्यात अग्रेसर असलेले तरुण कुढापा मंडळातर्फे संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे महानगरपालिका शाळा क्रमांक ३, पांजरापोळ परिसर या ठिकाणी दि. २५ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे आयोजनाचे पाचवे वर्ष आहे.

भागवताचार्य विशालशास्त्री गुरुबा यांनी सांगितले की, ज्याने एकांत साधून श्रीकांत मिळवला व लोकांपर्यंत पोहीचवला त्यांनाच संत म्हणतात. व्यक्तिने संसारात ध्रुव ताऱ्यासारखे अढळ राहणे शिकले पाहिजे. संसारात स्थिर राहणे महत्वाचे आहे. संत जनाबाईने नामस्मरणाच्या बळावर पंढरीच्या विठोबाला प्रसन्न केले आणि भक्तीच्या परमोच्च स्थानावर गेल्या असेही त्यांनी सांगत भागवत कथेतील विविध प्रसंग त्यांनी कथन केले.

मंगळवारी २८ डिसेंबर रोजी भागवत कथा श्रवणासह श्रीकृष्ण जन्म सोहळा होणार आहे. दुपारी १.३० वाजता भाविकांनी मनपा शाळा क्र. ३ येथे उपस्थिती देऊन लाभ घ्यावा असे आवाहन तरुण कुढापा मंडळातर्फे अध्यक्ष पंकज भावसार, उपाध्यक्ष सुमित सपकाळे, कार्याध्यक्ष शंभू भावसार यांनी केले आहे.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button