जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२१ । शहरातील गणपती नगर रस्त्यावर असलेल्या मार्वल कॅफेवर पोलिसांची कारवाई केल्याची बातमीचे वृत्त हटवावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल. अशी धमकी फोनवरुन दोन जणांनी इंडिया आपतक चॅनल जेष्ठ पत्रकार आनंद शर्मा यांना दिल्याचा प्रकार समोर आला आहे. धमकी देणार्या संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी सर्व पत्रकारांनी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
सविस्तर असे की, शहरातील गणपती नगर रस्त्यावर असलेल्या मार्वल कॅफेत प्रेमीयुगलांसाठी विशेष व्यवस्था असून त्याठिकाणी अश्लील चाळे चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह पथकाने त्याठिकाणी छापा टाकून कारवाई केली. कॅफेत दोन युगल देखील मिळून आले. संबंधित कॅफे चालकावर कारवाई देखील करण्यात आली. संबंधित प्रकरणाची माहिती आणि अधिकार्यांची प्रतिक्रिया असलेले वृत्त इंडिया आपतक चॅनलने प्रसारित केले होते. तदनंतर संपादक आनंद शर्मा यांना सदर व्हिडीओ वृत्त हटविणे संदर्भात किंवा कारवाई करण्याची धमकी देणारे दोन फोन मोबाईल क्रमांक +९१८८०६३०१५०० (पहिला फोन) व +९१८८५६०६१३२२ (दुसरा फोन) यावरून आले होते. पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पोलीस अधिकार्यांनी दिलेल्या बातमीच्या आधारे ते वृत्त प्रसारित करण्यात आले होते. ज्या नंबर वरून पत्रकारांना धमक्या देण्यात आले. त्या फोन क्रमांकांची तसेच व्यक्तींची सखोल चौकशी करून संबंधित कॅफे चालक-मालक यांच्यावर कठोर कारवाई करावी असे निवेदनात नमूद आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अध्यक्ष प्रवीण सपकाळे, जळगाव शहराध्यक्ष कमलेश देवरे, चंद्रशेखर नेवे, वाल्मिक जोशी, जकी अहमद, विजय वाघमारे, विजय पाटील, जुगल पाटील, बंटी थोरात, वाहेद काकर, धर्मेंद्र राजपूत, वसीम खान, चेतन वाणी, जितेंद्र कोतवाल, अय्याज मोहसीन, रजनीकांत पाटील, अनिल केराले, किशोर पाटील, भूषण हंसकर आदी पत्रकार उपस्थित होते.
हे देखील वाचा :
- आयुर्वेद हा जगण्याचा सार – डॉ. केतकी पाटील
- माजी खा. ईश्वरबाबूजी जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी यांनी दिले “विजयी भव” चे आशीर्वाद
- आश्वासने नव्हे विकासकामे करणार; अनिल चौधरींचा मतदारांना शब्द
- दुर्दैवी! वाढदिवसाच्या दिवशीच जळगावच्या तरुणाला मृत्यूने गाठले
- नोकरीचे आमिष देऊन जळगावच्या शेतकऱ्याला ११ लाखात गंडविले