जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२१ । शहरातील ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात प्रसिद्ध गणितज्ञ रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक डी.व्ही.चौधरी यांनी रामानुजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी गणितीय रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.यात 34 विद्यार्थी सहभागी झाले तसेच प्रणाली नारखेडे, तनुश्री पाटील अंकीता पाटील, भूमिका माळी, पूर्वा राणे, राजश्री शिंदे, श्रीकांत देवरे, अश्विनी चौधरी, मानसी सुतार या विद्यार्थ्यांनी गणितज्ञ रामानुजन यांच्या जीवनावर आधारित प्रसंग कथन केले तसेच रामानुजन यांच्या मॅजिक स्क्वेअर आणि इतर गणितीय कोडे याबद्दल माहिती दिली.
शाळेचे जेष्ठ शिक्षक महेन्द्र नेमाडे गणितातील इनफिनिटी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहीणी पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन पूनम कोल्हे यांनी केले. कार्यक्रमासाठी एन.बी.पालवे, सतिश भोळे, पराग राणे, मनिषा ठोसरे, बी.डी.झोपे यांनी सहकार्य केले.
हे देखील वाचा :
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- सरकारी नोकर भरतीतील शिंदे-फडणवीस सरकारच्या गेमचेंजर पॉलिसीमुळे पात्र युवकांना संधी
- 10वी आणि 12वी परीक्षेच्या फीमध्ये वाढ; आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार?
- लाल किल्ल्यावरून मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा
- विनापरीक्षा नोकरीची मोठी संधी ; 3256 जागांवर निघाली भरती, पगारही भरघोष मिळेल..