⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | जळगाव जिल्हा | भडगाव | भडगाव येथील चोरीच्या गुन्ह्यात तिघांना‎ एलसीबीने केली अटक

भडगाव येथील चोरीच्या गुन्ह्यात तिघांना‎ एलसीबीने केली अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ डिसेंबर २०२१ । भडगाव‎ शहरातील चोरीच्या घटनेतील तीन ‎संशयितांना एलसीबीच्या पथकाने ‎‎ताब्यात घेतले. त्यांच्याकडून‎ ७ मोबाइल आणि चार हजार रुपये‎ रोख हस्तगत केले.सुनील‎ पवार‎ (वय २२), अनिल‎ सूर्यवंशी (वय २७), विजय घोडेस्वार (वय १९) असे संशयितांचे नाव आहे. त्यांना येथील पोलिसांच्या ‎ताब्यात देण्यात आले आहे.

सविस्तर असे की, भडगावातील यशवंतनगर भागात‎ अर्जून भिल्ल यांच्याकडे ९‎ डिसेंबरला घरफोडी झाली. त्यात‎ सुमारे ८ हजार ५०० मुद्देमाल चोरांनी‎ लांबवला होता. याप्रकरणी ११‎ डिसेंबरला फिर्याद दाखल झाली होती.‎१६ रोजी एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरण कुमार‎ बकाले यांनी भडगाव पोलिस ‎स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्याचा तपास‎ करून संशयितांचा शोध घेण्याच्या‎ सूचना पथकाला दिल्या होत्या.‎ त्यानुसार शहरात गुप्त माहितीनुसार‎ शोध घेऊन सहाय्यक फौजदार‎ अशोक महाजन, हेड कॉन्स्टेबल‎ लक्ष्मण पाटील, पोलिस नाईक‎ ‎रणजित जाधव,‎ ‎नंदलाल पाटील,‎ ‎किशोर राठोड,‎ ‎भगवान पाटील,‎ ‎ईश्वर पाटील,‎ ‎उमेश गोसावी,‎ विनोद पाटील,‎‎ श्रीकृष्ण देशमुख व ‎चालक पवार‎ यांच्या पथकाने‎ ‎ संशयित सुनील‎ ‎परशुराम पवार‎ (वय २२), अनिल विरभान‎ सूर्यवंशी (वय २७), विजय प्रकाश‎ घोडेस्वार (वय १९) यांना ताब्यात‎ घेतले. त्यांच्याकडून सात मोबाईल‎ व चार हजार रुपये रोख असे एकूण‎ २१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल‎ जप्त करत पंचनामा केला.

 

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.