सावदात विविध विकासकामांचे उदघाटन
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२१ । सावदा नगरपरिषदेकडील विविध विकास कामांचे उद्घाटन समारंभ १५ रोज दुपारी ४.०० वाजता रावेर लोकसभा खा.रक्षाताई खडसे यांच्या हस्ते संपन्न झाले,यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकनाथरावजी खडसे, माजी महसुल मंत्री, महाराष्ट्र राज्य हे होते तर प्रमुख पाहुणे जिल्हा बँकेच्या संचालिका रोहिणीताई खडसे, नगरपालिका अध्यक्षा अनिता येवले व सर्व नगरसेवक नगरसेविका सावदा न.पा.डॉ. अतुल सरोदे सावदा,यांचेसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्याधिकारी न.पा.सावदा किशोर चव्हाण यांनी प्रथम प्रास्ताविक मांडताना मागील कालखंडात शहरात झालेली विकास कामे समोर मांडली.यात शहरातील महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान योजने अंतर्गत न.प.हद्दीतील मुस्लीम समाजाचे शेजारील ईदगाहचे पुर्वेकडील जागेत हॉल उद्घाटन,वैशिष्ठ्यपुर्ण कामे योजनेतंर्गत न.प.मालकिच्या सि.स.नं.१७५५/१ मधील न.प.कार्यालय पूरक इमारत (पहिलामजला) उद्घाटन समारंभ,वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत प्राप्त अनुदानातून आ.गं.हायस्कूल मधील वर्गखोल्या इमारतीचे उद्घाटन समारंभ,वैशिष्ट्यपूर्ण कामे योजनेंतर्गत न.प. हद्दीतील जमादारवाडा भागातील सि.स.नं. २७८६ मधील तडवी समाजासाठी कम्युनिटी हॉल इमारत,वैशिष्ट्यपुर्ण अनुदान योजने अंतर्गत सावदा शहर विकास योजनेतील आ.क्र.२७-सिव्हीक सेंटर अंतर्गत न.पा.मालकीचे ग.नं. ६४९+६५० मधील बहूद्देशीय सभागृह यांची माहिती त्यांनी समोर ठेवली, सूत्र संचालन संजय महाजन सर यांनी केले, कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व शहरातील नागरिक उपस्थित होते.