⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | खुशखबर! Netflix प्लॅनमध्ये मोठी कपात, जाणून घ्या नवे दर

खुशखबर! Netflix प्लॅनमध्ये मोठी कपात, जाणून घ्या नवे दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२१ । नेटफ्लिक्स (Netflix) इंडियाने आपल्या सबस्क्रिप्शन प्लॅनच्या किंमतीत कपात केली आहे. भारतातील अॅमेझॉन प्राइम आणि डिस्ने + हॉटस्टार यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. कंपनीने आपल्या सर्व प्लॅनच्या किंमती कमी केल्या आहेत, ज्यात फक्त मोबाईल प्लॅनचा समावेश आहे. स्ट्रीमिंग दिग्गज Netflix च्या मोबाईलची किंमत आता प्रति महिना 149 रुपये करण्यात आली आहे, जी आधी 199 रुपये होती. नेटफ्लिक्सच्या बेसिक, स्टँडर्ड आणि प्रीमियम प्लॅनची ​​नवीन किंमत पाहूया…

आधी सांगितल्याप्रमाणे, आता कंपनीचा मोबाईल प्लान 199 रुपयांवरून 149 रुपयांवर आला आहे. त्याच वेळी, प्रीमियम प्लॅन आता 799 रुपयांवरून 649 रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे.


सर्व योजनांची नवीन किंमत काय आहे
सर्वप्रथम, मोबाईल प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर ते 199 रुपयांवरून 149 रुपयांपर्यंत कमी करण्यात आले आहे, तर बेसिक प्लॅन 499 रुपयांऐवजी 199 रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे. ग्राहकांनो, त्याचा स्टँडर्ड प्लान 649 रुपयांवरून 499 रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे. शेवटी, त्याचा प्रीमियम प्लॅन 799 रुपयांऐवजी 649 रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे.

दुसरीकडे, Amazon बद्दल बोलायचे झाले तर, त्याचा प्राइम प्लान प्लॅन 129 रुपये प्रति महिना आहे आणि Disney + Hotstar चा प्रीमियम सेवेचा वार्षिक प्लान Rs 1499 आहे.

मोबाईलसाठी त्याचा प्लॅन 499 रुपयांचा आहे. Netflix च्या नवीन प्लॅनला ‘Happy New Prices’ असे नाव देण्यात आले आहे आणि नवीन प्लॅन आज, 14 डिसेंबरपासून लागू झाला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.