जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२१ । चोपडा तालुक्यातील चहार्डी येथे चक्क एकाच रात्री चोरट्यांनी नऊ घरे फोडली.त्यात कपाटातील रोकड आणि सोने व चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना १३ रोजी सकाळी उघडकीस आली.या घटनेची माहिती पोलीस पाटील रोहित रायसिंग यांनी येथील शहर पोलीसात दिली. असून,नऊ घरातील चोऱ्यांमध्ये जवळपास पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास झाला असण्याची शक्यता आहे.
चहार्डी गावातील लग्न व इतर कार्यक्रमांनिमित्त घरे बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी ही संधी साधली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. ग्रामपंचायत सदस्य दिनकर त्र्यंबकराव सोनवणे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून ७० हजार रुपये रोख भोईवाड्यातील राहुल दगडू सोनवणे यांच्या घरातील ऐवजही लंपास केलेला आहे. तसेच अशोक रामराव पाटील परेश माधवराव पाटील,नीरज जगदीश पाटील,चंदन प्रोव्हिजन, गणेश भोई, कोळीवाड्यातील संदीप शिरसाट, गुजरपुरा भागातील राजेंद्र महाजन यांच्या घरातून चोरट्यांनी रोख रक्कम व सोने-चांदीचे दागिने लांबविले आहेत. रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने किती गेले आहेत हे घरमालक घरी नसल्याने अद्याप समजू शकलेले नाहीत. पोलीस पाटील रोहित रायसिंग यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्याला या घटनेची माहिती दिली.नऊ घरातील चोऱ्यांमध्ये जवळपास पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास झाला असण्याची शक्यता आहे.
सहा महिन्यांपूर्वी चोरट्यांनी येथील शामराव शिवराम पाटील माध्यमिक विद्यालयातील जनरल रजिस्टर दालनातच जाळून टाकल्याची घटना घडली होती. त्यातील चोर अजूनही पोलिसांना हाती लागत नाहीत,तोपर्यंत नऊ घरे फोडून चोरट्यांनी पोलिसांना आव्हानच दिले आहे गावात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेड बसवले आहेत. झाडवन चौकातील सोन्या-चांदीच्या दुकानात तसेच गुजरपुरा येथील किराणा दुकानासमोरील सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहेत.या चोरट्यांच्या हातात एक गावठी कट्टा दिसत असल्याची चर्चा आहे.