गुगल न्यूज इनिशेटीव्ह : भारतातील १५० पोर्टलमध्ये ‘जळगाव लाईव्ह’ची निवड

डिसेंबर 10, 2021 4:51 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२१ । अल्पावधीतच जळगावकरांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या ‘जळगाव लाईव्ह न्यूज’ पोर्टलची (Jalgaon Live News) गुगल न्यूज इनिशेटीव्ह (Google News Initiative) या विशेष उपक्रमात निवड झाली आहे. देशभरात स्थानिक भाषांमध्ये मजकुर प्रकाशित करणाऱ्या १५० न्यूज पोर्टलमध्ये जळगाव लाईव्ह न्यूजची निवड झाल्याने जळगावकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

jalgaon-live-news-selected-for-google-news-initiative
google-news-initiative-jalgaon-live-news
गुगलतर्फे जळगाव लाईव्ह न्यूजला प्राप्त झालेला ई-मेल

संपूर्ण भारतात विविध भाषांमध्ये दर्जेदार मजकुर (बातम्या/लेख/विश्लेषण) प्रसिध्द करणार्‍या ऑनलाईन फ्लॅटफॉर्मची दरवर्षी गुगलकडून निवड करण्यात येते. यंदा मराठी भाषेकरीता जळगाव लाईव्ह न्यूजची निवड झाली आहे. डिसेंबर २०२१ ते मे २०२२ या कालावधीत गुगल इंडियातर्फे जळगाव लाईव्ह न्यूजला विशेष सहकार्य करण्यात येणार आहे. यात अधिक दर्जेदार व विश्वसनिय मजकुर प्रकाशित करणे, प्रसिध्द झालेला मजकुर व्हायरल करणे, ऑनलाइॅन रेव्हेन्यू वाढविणे आदींबाबत विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शन पुरविण्यात येणार आहे. यासह गुगलकडून काही विशेष तांत्रिक सहकार्य देखील पुरविण्यात येईल.

ऑनलाईन पोर्टलमध्ये अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या गुगल न्युज इनिशेटीव्हमध्ये जळगाव लाईव्ह न्यूजची निवड झाल्यामुळे आमच्या प्रामाणिककामाची पावती मिळाली असल्याची भावना टीम जळगाव लाईव्ह न्यूजतर्फे व्यक्त करण्यात आली.

अल्पवधीतच जिंकला जळगावकरांचा विश्वास

ऑनलाईन पोर्टलच्या भाऊगर्दीत केवळ आठ महिन्यात स्वत:ची वेगळी वाट निवडणार्‍या ‘जळगाव लाईव्ह न्यूज’ पोर्टलची गुगल न्यूज इनिशेटीव्हमध्ये निवड होणे ही सर्व जळगावकरांसाठी मोठ्या अभिमानाची बाब आहे. २४ फेब्रुवारी २०२० मध्ये जळगाव लाईव्हची सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंत २ कोटी ५० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे. फेसबुकवर ७२ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. इतकंच नव्हे तर फेसबुकचा रिच दरमहा कोटींमध्ये असतो.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now