⁠ 
शुक्रवार, ऑक्टोबर 18, 2024
Home | बातम्या | अन्न पदार्थ विक्रेत्यांना तेल साठ्याची माहिती ठेवणे आवश्यक; अन्यथा होऊ शकते ‘ही’ कारवाई

अन्न पदार्थ विक्रेत्यांना तेल साठ्याची माहिती ठेवणे आवश्यक; अन्यथा होऊ शकते ‘ही’ कारवाई

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२१। प्रतिदिन ५० लिटरपेक्षा अधिक खाद्य तेलाचा वापर असलेल्या व्यावसायिकांना दररोज वापरत असलेल्या तेलाचे रेकार्ड ठेवणे आवश्यक आहे. तसेच वापरल्यानंतर किती तेल शिल्ल्क राहिले, शिल्लक राहिलेले तेलाची विल्हेवाट कशी लावली किंवा शिल्लक तेल हे कोणत्या नोंदणीकृत बायेडिझेल उत्पादकाला दिले त्यासंबंधी पूर्ण नोंदी ठेवणे आवश्यक आहे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. दरम्यान, तसे न केल्यास व्यावसायिकावर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे, असेही त्यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील ज्या अन्न व्यासायिकांचा खाद्य तेलाचा वापर प्रतिदिवस ५० लिटरपेक्षा अधिक आहे, अशा व्यावसायिकांसाठी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत नियम आहेत. त्यानुसार संबंधितांनी तेलाचे रेकॉर्ड ठेवणे आवश्यक आहे. तसेच तळलेल्या तेलाचा पुनर्वापर टाळावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांकडून करण्यात आले आहे. खाद्य पदार्थ तळण्यासाठी वापरण्यात येणारे तेल हे फक्त एकदाच तळणासाठी वापरावे. त्यानंतर पुढील दोन दिवसांत या तेलाचा वापर करून संपवावे. जर ते आपण पुन्हा तळण्यासाठी वापरले, तर त्यातील पोलर कंपाऊंडचे व ट्रान्सफॅटचे प्रमाण वाढून ते आरोग्यावर विपरीत परिणाम करते. सर्व वयोगटातील लोकांना तळलेले पदार्थ हे आकर्षित करतात. मुख्यत्वे कचोरी, समोसा, भजे, वडे, पाणीपुरी यासारख्या अन्न पदार्थाची मोठी मागणी असते. हे खाद्यपदार्थ सहज उपलब्ध असतात. अन्न पदार्थ तळण्याकरीता वापरले जाणारे तेल हे पुन्हा-पुन्हा तळण्यासाठी वापरले गेले, तर त्यामध्ये पोलर कंपाऊंडस व वाईट कोलेस्ट्रॉल ट्रॉन्सफटचे प्रमाण वाढून त्यापासून हृदयविकार, कोलोन कॅन्सरचा धोका असतो. तसेच पंचनसंस्थेसंबंधी विकार उदभवण्याचा धोका असतो. खाद्य तेलाचा तळण्यासाठी वापर करताना गॅस हा कमी आचेवर ठेवा म्हणजेच तेलामधून धूर येणार नाही याची काळजी घ्यावी. तळण्यासाठी शक्यतो स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा वापर करावा, लोखंडी कढईचा वापर टाळावा. तळताना तेलात जमा झालेले अन्न कण हे वारंवार तळून काळे होण्यापूर्वीच लगेचच काढावेत. तळलेल्या तेलाचा पुनर्वापर टाळावा. शिल्ल्की राहिलेले तेल हे पुढील दोन दिवसातच भाजीला फोडणी घालण्यासाठी वापरुन संपवावे, असे आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आले आहे.

दंडात्मक कारवाईची तरतूद
लहान- मोठ्या अन्न व्यवसायिकांनी तेलाचा वापर प्रतिदिन ५० लिटरपेक्षा जास्त आहे, अशा व्यावसायिकासाठी अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र शासन या विभागामार्फत राबविल्या जाणा-या अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत काही नियम आहेत. मोठ्या अन्न व्यावसायिकांनी ते दररोज वापरत असणाऱ्या तेलाचे रेकार्ड ठेवणे आवश्यक आहे. तसेच वापरुन किती तेल शिल्ल्क, शिल्लक राहिलेले तेलाची विल्हेवाट कशी लावली किंवा शिल्लक तेल हे कोणत्या नोंदणीकृत बायेडिझेल उत्पादकाला दिले त्यासंबंधी पूर्ण नोंदी ठेवणे आवश्यक आहे. तसे न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. त्याचप्रमाणे तळण्यासाठीचे खाद्यतेलाचा पुनर्वापरावर निर्बंध घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या जिल्हा कार्यालयामार्फत संबंधित अन्न व्यावसायिकांकडे जावून तपासणी करण्यात येते. टीपीसी मीटरच्या साह्याने तळण्यासाठी वापरत असलेल्या तेलाची तपासणी करुन जर टीपीसी हे २५ टक्यांपेक्षा जास्त असेल तर अन्न व्यावसायिक पुढील कायदेशीर कारवाईस पात्र ठरतात, असेही सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांनी म्हटले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.